कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन भारतासोबत अनेक देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. आता अनेक देशात लॉकडाउनचे नियम शिथिल करण्यात आले आहेत. मात्र तरीही सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर अनिवार्य आहे. मात्र मास्क न वापरता न्यूड मॉडेल इवा मारियाला फोटोशूट करणे महागात पडले आहे.लॉकडाउनमध्ये न्यूड मॉडेल इवा मारियाने फोटोशूट करायचे ठरवले. आजपर्यंत अनेकवेळा इवा नेहमी स्टेडियम, सार्वजनिक ठिकाणी किंवा धार्मिक स्थळांवर 'न्यूड फोटोशूट्स' केल्यामुळे वादात सापडली आहे. यावेळी पण तिने लॉकडाऊनचे उल्लंघन करीत परवानगी न घेता प्रसिद्ध फुटबॉल स्टेडियमसमोर न्यूड फोटोशूट केले. मात्र, पोलिसांनी तिने मास्क न घातल्यामुळे दंड ठोठावला आहे.
रस्त्यावर न्यूड फोटोशूट करणं या मॉडेलच्या आलं अंगाशी, कारण वाचून व्हाल हैराण
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2020 17:30 IST