Join us
Daily Top 2Weekly Top 5

ऑस्कर विजेता अभिनेता Leonardo Dicaprio ला हॅलो बोलण्याची या रिअ‍ॅलिटी स्टारला मिळाली शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 19:03 IST

टेलिव्हिजन रिअ‍ॅलिटी स्टार जेमा कोलेंसने दावा केला की, केवळ हॅलो म्हटल्यावर लिओनार्डोने तिला यूएसमधील एका क्लबमधून 'बाहेर' काढलं होतं.

काही दिवसांपूर्वी ऑस्करमध्ये विल स्मिथने क्रिस रॉसला कानशीलात वाजवून तो वादात सापडला होता.त्याच दिवशी त्याला ऑक्सर अवॉर्डही मिळाला होता. आता ऑस्कर अवॉर्ड विजेता अभिनेत लिओनार्डो दी कॅप्रिओ (Leonardo Dicaprio) एका गोष्टीमुळे चर्चेत आला आहे. टेलिव्हिजन रिअ‍ॅलिटी स्टार जेमा कोलेंसने (Gemma Collins) दावा केला की, केवळ हॅलो म्हटल्यावर लिओनार्डोने तिला यूएसमधील एका क्लबमधून 'बाहेर' काढलं होतं.

कोलेंस लिओनार्डोची मोठी फॅन आहे. एका मुलाखतीत तिने सांगितलं की, जेव्हा तिने लिओनार्डो डी कॅप्रिओला बघून हॅलो म्हणण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी मला क्लबमधून बाहेर काढलं. त्यानंतर ती पुन्हा त्या क्लबमध्ये गेली नाही. कोलेंस आता अर्थातच लिओनार्डोचा टायटॅनिक सिनेमा पुन्हा बघणार नाही. या पूर्ण प्रकरणावर लिओनार्डोकडून काहीच स्पष्टीकरण आलं नाही.

कोलेंस ही तिच रिअ‍ॅलिटी स्टार आहे जिने तिचा बॉयफ्रेन्ड चार्ली किंगसोबत न्यूड होऊन टायटॅनिकचा सीन केला होता. टायटॅनिक सिनेमात लिओनार्डोने केट विन्सलेटचा न्यूड फोटो काढला होता. हे कोलेंससाठी तिचा बॉयफ्रेन्ड चार्लीसाठी केलं होतं. 

पुढील महिन्यात जेमा शिकागोमध्ये स्टेज शो करणार आहे. तेच लिओनार्डो कॅमिला मोरोनसोबत डेटिंग करत असल्याने चर्चेत आहे. कॅमिला मोरोन लिओनार्डो डीकॅप्रिओपेक्षा २३ वर्षाने लहान आहे.

टॅग्स :लिओनार्डो डिकैप्रियोहॉलिवूड