Join us
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर कार्तिक आर्यनने बनवले हे मीम, पाहून तुम्हाला आवरणार नाही हसू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2020 10:56 IST

कार्तिक आर्यनच्या या मीमला सोशल मीडियावर खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे.

ठळक मुद्देअक्षय ऐवजी कार्तिकने फोटोशॉपने त्याचा फोटो मॉर्फ केला आहे आणि त्यावर लिहिले आहे की, मोदी जी ये लोग ऐसे नही मानेंगे....ये सुनना चाहते है 21 दिन में पैसा डबल....

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशभरात २१ दिवसांसाठी लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर सोशल मीडियावर लॉकडाऊन संदर्भात अनेक मीम्स फिरत आहेत आणि आता तर अभिनेता कार्तिक आर्यनने एक भन्नाट मीम सोशल मीडियावर शेअर केले आहे. अक्षय कुमारचा फिर हेरा फेरी हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटातील अक्षय आणि राजपाल यादवचे एक दृश्य प्रचंड प्रसिद्ध आहे. 

या दृश्यात अक्षय राजपाल यादवला 21 दिवसांत पैसे डबल कसे करायचे हे सांगताना आपल्याला पाहायला मिळाले होते. याच दृश्यात अक्षय ऐवजी कार्तिकने फोटोशॉपने त्याचा फोटो मॉर्फ केला आहे आणि त्यावर लिहिले आहे की, मोदी जी ये लोग ऐसे नही मानेंगे....ये सुनना चाहते है 21 दिन में पैसा डबल....

कार्तिक आर्यनच्या या मीमला सोशल मीडियावर खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याच्या सेन्स ऑफ ह्युमरचे कौतुक सोशल मीडियावर केले जात आहे. कार्तिक आर्यन गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. त्याने लोकांनी कोरोनाचे गांभीर्य ओळखून घरातून बाहेर पडू नये असे सांगणारा व्हिडिओ त्याच्या इन्स्टाग्रामवर काही दिवसांपूर्वी पोस्ट केला होता. 

या पोस्टद्वारे कार्तिकने त्याच्या अंदाजात लोकांच्या डोळ्यात अंजन घालण्याचा प्रयत्न केला होता. लोकांनी जास्तीत जास्त संख्येने घरी थांबावे, घरूनच काम करावे. एकदा हा व्हायरस मोठ्या प्रमाणात पसरला की, त्याला आटोक्यात आणणे कठीण असल्याचे कार्तिक सांगताना दिसला होता. केवळ अडीज मिनिटांचा हा व्हिडिओ असून या व्हिडिओचे सामान्य लोकच नव्हे तर सेलिब्रेटी देखील कौतुक करताना दिसले होते.

टॅग्स :कार्तिक आर्यनअक्षय कुमार