हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्याची कॅन्सरशी झुंज अपयशी ठरल्याने त्याचं निधन झालं आहे. जेम्स वॅन डेर बीक (James Van Der Beek) यांचे निधन झाले असून, या बातमीने चित्रपटसृष्टीत आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. वयाच्या अवघ्या ४८ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. जेम्स गेल्या काही काळापासून कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी लढा देत होते, मात्र ही झुंज अखेर अपयशी ठरली.
जेम्स यांच्या निधनाची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे शेअर केली आहे. त्यांच्या इंस्टाग्राम पेजवर गुरुवारी त्यांच्या निधनाची अधिकृत माहिती देण्यात आली. जेम्स यांच्या पश्चात त्यांचे कुटुंब आणि मोठा चाहतावर्ग आहे.
जेम्स यांना जेव्हा त्यांच्या कॅन्सरबद्दल समजले, तेव्हा त्यांनी खचून न जाता या आजाराबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचे काम सुरू केले होते. ते सातत्याने कॅन्सर अवेयरनेस मोहिमांमध्ये सहभागी होऊन इतरांना प्रेरणा देत होते. मात्र, दुर्दैवाने त्यांनी या जगाचा निरोप घेतला.
चाहत्यांकडून श्रद्धांजली
जेम्स वॅन डेर बीक यांच्या निधनानंतर हॉलिवूडमधील त्यांचे सहकारी कलाकार आणि जगभरातील चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. त्यांच्या 'डॉसन्स क्रीक' (Dawson's Creek) सारख्या लोकप्रिय मालिका आणि चित्रपटांमधील अभिनयासाठी ते नेहमीच लक्षात राहतील. जेम्स यांच्या निधनामुळे हॉलिवूडने एक प्रतिभावान अभिनेता आणि एक संवेदनशील व्यक्तिमत्व गमावले आहे.