Join us

४ दिवसांत जमवलाय १७१० कोटींचा गल्ला, 'हा' अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट रिलीज होताच ट्रेंडिंगमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 11:02 IST

भारतासह जगभरात आणखी एका हॉलिवूड चित्रपटाची जादू पाहायला मिळत आहे.

गेल्या काही वर्षांत भारतात हॉलिवूड चित्रपटांची लोकप्रियता झपाट्याने वाढताना दिसत आहे. "अ‍ॅव्हेंजर्स", "फास्ट अँड फ्युरियस", "अवतार", "ज्युरासिक वर्ल्ड" यांसारख्या चित्रपटांनी भारतीय बॉक्स ऑफिसवर प्रचंड गल्ला जमवला आहे. अलिकडेच 'मिशन इम्पॉसिबल ८' आणि 'फायनल डेस्टिनेशन ६' हे प्रदर्शित झाले होते. या चित्रपटांना भारतीयांचं खूप प्रेम मिळालं. आता या दोन चित्रपटांनंतर, भारतासह जगभरात आणखी एका हॉलिवूड चित्रपटाची जादू पाहायला मिळत आहे.

चार दिवसांपूर्वी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या एका हॉलिवूड चित्रपटाने एका आठवड्यात १७०० कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली आहे. हा चित्रपट दुसरा तिसरा कोणात नसून नसून 'हाऊ टू ट्रेन युवर ड्रॅगन' हा आहे. हा एक लाईव्ह अ‍ॅक्शन चित्रपट आहे. जो २०१० मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हाऊ टू ट्रेन युवर ड्रॅगन' या अ‍ॅनिमेटेड चित्रपटाचा रिमेक आहे.

'हाऊ टू ट्रेन युवर ड्रॅगन' या चित्रपटाची कथा २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या क्रेसिडा कॉवेल यांनी लिहिलेल्या कादंबरीवर आधारित आहे. ड्रीमवर्क्स अ‍ॅनिमेशनच्या बॅनरखाली बनवलेला हा चित्रपट डीन डीब्लॉइस यांनी दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट १३ जून रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आणि प्रदर्शित होताच त्याने बॉक्स ऑफिसवर कब्जा केला. सॅकनिल्कच्या मते, 'हाऊ टू ट्रेन युअर ड्रॅगन'ने अवघ्या ४ दिवसांत जगभरात १७१० कोटी रुपयांची कमाई केली आहे. परदेशात या चित्रपटाने ९८५ कोटी रुपये कमावले तर भारतातही त्याची चांगली कमाई झाली. 

टॅग्स :हॉलिवूडसिनेमा