Join us

१ तास ४२ मिनिटांचा हा हॉरर सिनेमा एकट्याने पाहाल तर घाबरुन जाल; IMDB वरही चांगलं रेटिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 17:19 IST

या हॉरर सिनेमाची चर्चा आहे. तुम्ही पाहिलात का? नसेल बघितला तर जाणून घ्या

हॉरर सिनेमांचा स्वतःचा एक वेगळा चाहतावर्ग आहे. हे सिनेमे पाहण्यासाठी काही लोक मुद्दाम रात्रीची वाट बघत असतात. २०२४ मध्ये बॉलिवूडमध्ये 'स्त्री २', 'मुंज्या' या हॉरर सिनेमांनी बॉक्स ऑफिस गाजवलं. त्यामुळे बॉलिवूडमध्येही आता हॉरर सिनेमांचा स्वतःचा एक चाहतावर्ग तयार झालाय. आज आम्ही तुम्हाला अशाच एका हॉरर सिनेमाबद्दल सांगणार आहोत. जो २०२२ साली रिलीज झाला अन् बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. जाणून घ्या या सिनेमाबद्दल

काय आहे या हॉरर सिनेमाचं नाव?

या सिनेमाचं नाव 'बारबेरियन'. २०२२ साली हॉलिवूडचा हा सिनेमा रिलीज झाला. या सिनेमाची कहाणी एका महिलेभोवती फिरते. ही महिला भाड्याने घेतलेलं घर बघण्यासाठी येते. तेव्हा तिला कळतं की या घरात आधीपासून एक माणूस राहतोय. या सिनेमात पुढे एक भयानक ट्विस्ट येतो. जेव्हा त्यांना त्या घरात असलेल्या रहस्याची जाणीव येते. हे रहस्य अत्यंत भयंकर असतं. दोघांच्या पायाखालची जमीन सरकते. काय असतं हे रहस्य? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला 'बारबेरियन' सिनेमा पाहावा लागेल.

कुठे पाहाल हा सिनेमा?

हा सिनेमा सध्या ओटीटीवर उपलब्ध आहे. प्राइम व्हिडीओ या ओटीटी चॅनलवर  'बारबेरियन' सिनेमा तुम्हाला पाहता येईल. या हॉलिवूड सिनेमाने प्रेक्षकांचं चांगलं प्रेम मिळवलं. याशिवाय बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली. IMDB या सिनेमाच्या रेटिंग वेबसाईटवर या सिनेमाला १० पैकी ७ रेटिंग आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या पहिल्या वीकेंडला जर तुम्हाला एखादा हॉरर सिनेमा बघायचा असेल तर 'बारबेरियन' तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे.

टॅग्स :हॉलिवूड