Join us

विक्रांत मेस्सीनंतर आणखी एका अभिनेत्याने दिले निवृत्तीचे संकेत, म्हणाला, "अनेक वर्ष झाले..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 13:32 IST

कोण आहे हा अभिनेता?

फिल्म इंडस्ट्रीत काम करणं तसं सोपं नाही. अनेक वर्ष कलाकारांना संघर्ष करावा लागतो. तसंच एक एक सिनेमा बनवून तो रिलीज होईपर्यंत कित्येक वर्षही जातात. अशातच नुकतंच अभिनेता विक्रांत मेस्सीने फिल्म इंडस्ट्रीपासून मोठा ब्रेक घेत असल्याचं जाहीर केलं. निवृत्ती नाही पण मोठा ब्रेक घेणार असल्याचं त्याने स्पष्ट केलं. त्यानंतर आता आणखी एका अभिनेत्याने अभिनयातून निवृत्तीचे संकेत दिले आहेत.

Twilight या हॉलिवूड सिनेमातील मुख्य अभिनेता रॉबर्ट पॅटिन्सनने (Robert Pattinson) एका मुलाखतीत खुलासा केला. रॉबर्ट आगामी 'बॅटमॅन' ट्रायोलॉजी मध्ये दिसणार आहे. यामध्ये तो स्वत: बॅटमॅन आहे. २०२६ साली सिनेमा रिलीज होणार आह. याविषयी 'द न्यूयॉर्क टाइम्स'शी बोलताना रॉबर्ट म्हणाला, "बॅटमॅन ट्रायोलॉजी संपली की मी खरंच निवृत्ती घेईन. मला पहिली संधी मिळाल्यानंतर मी अनेक वर्ष हेच करेन असं मला वाटलं नव्हतं. अजूनही माझं हेच काम सुरु आहे यावर माझा विश्वासच बसत नाहीए."

रॉबर्ट पॅटिन्सन जगातील हँडसम अभिनेत्यांपैकी एक आहे. तो कोणत्याही सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवरही नाही. तो कधीच फारशा मुलाखतीही देत नाही. जमेल तितकं तो कोणत्याही चर्चांपासून दूर राहतो. 'ट्वायलाईट' सिनेमामुळे रॉबर्टला खरी लोकप्रियता मिळाली होती. सिनेमाचे चार भागही आले. शिवाय रॉबर्टने वयाच्या १७ व्या वर्षी हॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. 'हॅरी पॉटर - द गॉब्लेट ऑफ फायर' मध्ये त्याची भूमिका सर्वांच्याच लक्षात राहिली होती.

38 वर्षीय रॉबर्ट सुकी वॉटरहाऊससोबत रिलेशनशिपमध्ये आहे. २०१८ पासून ते एकमेकांना डेट करत आहेत. यावर्षीच मार्च महिन्यात त्यांना एक मुलगी झाली.

टॅग्स :हॉलिवूडसेलिब्रिटीविक्रांत मेसी