Join us
Daily Top 2Weekly Top 5

 हॉलिवूडच्या या लोकप्रिय अभिनेत्यालाही कोरोनाची बाधा, पत्नीलाही संसर्ग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2020 10:19 IST

100 हून अधिक देशांना कोरोना व्हायरसचा फटका बसल्यानंतर जगभरत भीतीचे वातावरण आहे. आता कोरोना हॉलिवूडमध्येही पोहोचला आहे.

ठळक मुद्देटॉम यांचाच ‘फॉरेस्ट गम्प’ या सिनेमाचा बॉलिवूड रिमेक येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

100 हून अधिक देशांना कोरोना व्हायरसचा फटका बसल्यानंतर जगभरत भीतीचे वातावरण आहे. आता कोरोना हॉलिवूडमध्येही पोहोचला आहे. होय, हॉलिवूडचे लोकप्रिय अभिनेते टॉम हँक्स आणि त्यांची पत्नी रिटा विल्सन यांची कोराना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. 63 वर्षीय टॉम यांनी खुद्द सोशल मीडियावर ही माहिती दिली.टॉम आणि रिटा दोघेही शूटींगसाठी ऑस्ट्रेलियाला गेले होते. ऑस्ट्रेलियाहून परत आल्यानंतर त्यांना ताप, सर्दी ही लक्षणे दिसू लागली. त्यांनी कोरोनाची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर टेस्ट पॉझिटीव्ह आली. टॉम हँक्स यांनी ट्विटरवरून त्यांना कोरोना झाल्याची माहिती दिली आणि  त्यांच्या फॅन्सना धक्का बसला.

टॉम यांनी यासंदर्भात एक ट्वीटही केले. ‘ आम्ही दोघे ऑस्ट्रेलियाला गेले होतो, त्यानंतर आम्हाला ताप आला आणि अंगदुखी जाणवू लागली. आम्ही तात्काळ वेळ न घालवता कोरोना टेस्ट करून घेतली. त्यानंतर ती पॉझिटीव्ह निघाली. आता आम्ही कोरानासाठी तयार केलेल्या खास वॉर्डमध्ये आहोत. उपचार सुरु आहेत. निष्काळीपणा न करता काही लक्षणे आढळल्यास तातडीने डॉक्टरकडे जा आणि टेस्ट करा असला सल्लाही त्यांनी दिलाय.

 टॉम हँक्स यांनी अनेक हॉलिवूड सिनेमांमध्ये काम केले. कास्ट अवे, फॉरेस्ट गम्प, कॅच मी इफ यू कॅन, द टर्मिनल असे त्यांचे अनेक चित्रपट गाजलेत. त्यांना दोन वेळा आॅस्कर हा मानाचा पुरस्कारही मिळाला होता. 

आमिर खान बनवत आहे टॉम यांच्या चित्रपटाचा रिमेकटॉम एक महान अभिनेते आहेत. टॉम यांचाच ‘फॉरेस्ट गम्प’ या सिनेमाचा बॉलिवूड रिमेक येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘लाल सिंग चड्ढा’ या नावाने आमिर खान हा रिमेक बनवत आहे.  

टॅग्स :हॉलिवूडकोरोना वायरस बातम्या