Join us

धक्कादायक! पत्नीच्या मृतदेहासोबत अभिनेता सात दिवस एकाच खोलीत; पुढे काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 09:24 IST

प्रसिद्ध अभिनेत्याच्या मृत्यूबद्दल पोलिसांनी तपास केल्यावर धक्कादायक माहिती समोर आली आहे

हॉलिवूडमधून एक महत्वाची बातमी समोर येत आहे जी वाचून तुम्हालाही धक्का बसेल. काही दिवसांपूर्वी हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते जीन हॅकमॅन, (gene hackmen death updates) त्यांची पत्नी आणि त्यांच्या कुत्र्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याच्या बातमीने एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर पोलिसांनी या अभिनेत्याच्या मृत्यूचा खोल तपास केला. या तपासाअंती सर्वांना धक्का देणारी बाब समोर आली. यामध्ये जीन पत्नीच्या मृतदेहासोबत तब्बल सात दिवस एकाच रुममध्ये असल्याचं समजतंय.पत्नीच्या मृतदेहासोबत सात दिवस अन्...मेडिकल एग्जामिनरनुसार, जीन हॅकमॅन अल्झायमर आजाराच्या अॅडव्हान्स लेव्हलवर पोहोचले होते. त्यामुळेच पत्नीचा मृत्यू झालाय याविषयी जीनला काहीच समजलं नसण्याची शक्यता आहे. याशिवाय जीनला हृदयासंबंधी आजारही होते. hantavirus pulmonary syndrome मुळे जीनची पत्नी बॅटसी मृत पावली. उंदरांमुळे हा आजार वाढतो, असं सांगण्यात येतं. अभिनेता जीनचं निधन झालं तेव्हा त्याच्या पोटात अन्नाचा एकही कण नव्हता. याशिवाय शरीरात पाण्याचीही कमतरता होती.जीन हॅकमॅन, त्यांची पत्नी आणि त्यांचा कुत्रा यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी तपास केल्यावर आढळून आलं की, अभिनेत्याच्या पत्नीचं निधन आधी झालं. परंतु अल्झायमर असल्याने जीनला याविषयी काहीच कळालं नाही. पुढे सात दिवसांनी त्याच खोलीत जीनचा मृत्यू झाला. अशाप्रकारे अभिनेता आणि त्याची पत्नी यांच्या आयुष्याचा शेवट अत्यंत करुण परिस्थितीत झाला.

टॅग्स :हॉलिवूड