Join us

पत्नीसाठी ही प्रसिद्ध अभिनेत्री झाली पुरुष, शस्त्रक्रिया करुन केला लिंगबदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2020 17:29 IST

प्रसिद्ध अभिनेत्रीने शस्त्रक्रिया करून लिंगबदल केला आहे. ही माहिती तिनेच सोशल मीडियावर दिली आहे.

हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री एलन पेज हिने लिंगबदल शस्त्रक्रिया करून पुरुषांचं लिंग स्वीकारले आहे. सोशलवर पोस्ट शेअर करत तिने याबाबतची माहिती दिली आहे. आता माझे नाव एलन नसून एलियट पेज आहे, असेही तिने सांगितले आहे. तुम्ही मला स्त्री म्हणा किंवा पुरुष मला फरक पडत नाही. मी तेच केले जे मला करायचे होते, असेही एलन म्हणाली आहे.

एलन पेजने सांगितले की, लहानपणापासूनच मला पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त आकर्षण होते. त्यामुळं ट्रान्सजेंडर होण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय काही लोकांना आवडलेला नाही. अनेकांनी माझ्यावर टीका केली. तुम्ही मला पुरुष म्हणा किंवा स्त्री मला काहीही फरक पडत नाही. मी तेच केले जे मला करायचे होते. आता लक्षात ठेवा माझे नाव एलन पेज नसून एलियट पेज आहे.

गेल्या तीन वर्षांपासून एलन पेज एमा पोर्टनरसोबत रिलेशनशिपमध्ये होती. अलीकडेच तिने गर्लफ्रेंडसोबत लग्नही केलं. पत्नीच्या प्रेमाखातर मी लिंगही बदलू शकते असे तिने काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते. यानंतर आता तिने हे ऑपरेशन एमासाठीच केल्याचे बोलले जात आहे.

एनलच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर तिने एक्स मेन, इ टू द फॉरेस्ट, इन्सेप्शन, जुनो अशा अनेक हॉलिवूड चित्रपटात काम केले आहे. 

टॅग्स :हॉलिवूडट्रान्सजेंडर