Join us

'गेम्स ऑफ थ्रोन्स'फेम अभिनेत्याचं वयाच्या 36 व्या वर्षी निधन; दुर्मिळ आजारामुळे मालवली प्राणज्योत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2023 16:17 IST

Darren kent: गेल्या कित्येक वर्षांपासून तो या आजारावर उपचार घेत होतो.

हॉलिवूडमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. गेम्स ऑफ थ्रोन्स अभिनेत्याचं निधान झालं आहे. अभिनेता डॅरेन केंट याचं वयाच्या अवघ्या ३६ व्या वर्षी निधन झालं आहे. डॅरेन गेल्या कित्येक वर्षांपासून एक दुर्मिळ आजाराने त्रस्त होता. अखरे या आजाराशी लढा देतादेता त्याची प्राणज्योत मालवली. त्याच्या निधनामुळे अनेकांना धक्का बसला असून सोशल मीडियावर त्याला आदरांजली वाहण्यात येत आहे.

डॅरेन केंट यांना काही वर्षांआधी ऑस्टियोपोरोसिस, अर्थराइटिस अँड स्किन डिसऑर्डर या दुर्मिळ आजाराचं निदान झालं होतं. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून तो या आजारावर उपचार घेत होतो. परंतु, या आजाराशी लढत असतानाच त्याची प्राणज्योत मालवली. डॅरेन केट याचं ११ ऑगस्ट रोजी निधन झालं. मात्र, ही माहिती १५ ऑगस्ट रोजी चाहत्यांना कळली. एका टॅलेंज एजन्सीकडून डॅरेन याच्या निधनाची माहिती ट्विटरद्वारे देण्यात आली. “अत्यंत दु:ख घटना घडली आहे. आपले अत्यंत लाडके अभिनेते डॅरेन केंट यांचं शुक्रवारी निधन झालं. ते त्यांच्या कुटुंबाबरोबर आणि मित्र मैत्रिणींबरोबर होते. या वाईट काळात आम्ही त्यांच्या कुटुंबियांबरोबर आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली", अशी पोस्ट शेअर करण्यात आली आहे.

दरम्यान,  2008 मध्ये त्यांनी मिरर्स या हॉरर सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. गेम ऑफ थ्रोन्समध्ये डॅरेन केंट यानं स्लिवर्सची भूमिका साकारली होती. तसंच 2023 मध्ये डंगऑन अँड ड्रेगंस ऑनर अमंग थीव्स हा त्याचा शेवटचा सिनेमा रिलीज झाला होता. डॅरेन अभिनेता असण्यासोबतच लेखक आणि दिग्दर्शकदेखील होता.  2021 साली आलेल्या ‘यू नो मी’ या शॉर्ट फिल्मसाठी त्यानं दिग्दर्शन केलं होतं. त्याचप्रमाणे ‘ब्लडी कट्स’, ‘ब्लड ड्राइव’, ‘द फ्रेक्सटीन क्रॉनिकल्स’, ‘मार्शल लॉ’, ‘स्नो व्हाइट अँड द हंट्समॅ और सॉरो’ या सिनेमात त्याने काम केलं होतं. 

टॅग्स :हॉलिवूडसेलिब्रिटीगेम ऑफ थ्रोन्स