Join us
Daily Top 2Weekly Top 5

Birthday Special : म्हणून क्रिस हेम्सवर्थने मुलीचे नाव ठेवले ‘इंडिया’...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2020 12:54 IST

नावामागची इंटरेस्टिंग कहाणी 

ठळक मुद्देक्रिसने त्याच्या करिअरमध्ये 25 पेक्षा अधिक सिनेमे केले आहेत. यात 8 अ‍ॅव्हेंजर्स सिनेमे आहेत.

हॉलिवूड सुपरस्टार क्रिस हेम्सवर्थ याचा आज वाढदिवस. क्रिस आज त्याचा 37 वा वाढदिवस साजरा करतोय. ‘थॉर’ सीरिजमुळे लोकप्रिय झालेल्या क्रिसचे भारताची जुने नाते आहे आणि विशेष म्हणजे, त्याने त्याच्या मुलीचे नाव ‘इंडिया’ ठेवले आहे. या नावामागे एक इंटरेस्टिंग कहाणी आहे.

2019 साली ‘मेन इन ब्लॅक - इंटरनॅशनल’ या सिनेमाच्या प्रमोशनवेळी क्रिसने मुलीच्या नावामागची ही इंटरेस्टिंग कहाणी सांगितली होती. तर क्रिसची पत्नी एल्सा हिने भारतात बराच काळ व्यथित केला आहे. भारतात घालवलेल्या या काळातील अनेक सुंदर आठवणी तिच्याजवळ आहेत. क्रिसच्या मनातही भारताबद्दल प्रेम आहे. याचमुळे दोघांनी आपल्या मुलीचे नाव ‘इंडिया ’ ठेवले.

क्रिसची पत्नी एल्सा ही सुद्धा एक मॉडेल व अभिनेत्री आहे. दोघांनाही तीन मुली आहे. इंडिया , साशा आणि त्रिस्तन अशी त्यांची नावे आहेत.

क्रिस हेम्सवर्थ अनेक हॉलिवूड चित्रपटांत दिसला. पण त्याला खरी ओळख दिली ती ‘थॉर’सीरिजने. लवकरच क्रिस ‘अ‍ॅव्हेंजर्स’च्या चौथ्या भागातही दिसला होता.  ऐकून आश्चर्य वाटेल पण, सुरुवातीला घराचे भाडे देण्यासाठीही क्रिसजवळ पैसे नव्हते. यामुळे तो अ‍ॅक्टिंगच्या दुनियेत आला. अ‍ॅक्टिंगच्या दुनियेत येण्याआधी वेटर, बारमॅन अशी अनेक कामे त्याने केली. क्रिसने त्याच्या करिअरमध्ये 25 पेक्षा अधिक सिनेमे केले आहेत. यात 8 अ‍ॅव्हेंजर्स सिनेमे आहेत.

 

टॅग्स :क्रिस हेम्सवर्थहॉलिवूड