Join us

Avtar The Way Of Water: केट विन्सलेटचा फर्स्ट लुक आला समोर, अभिनेत्रीला पाहून चाहते झाले थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2022 18:21 IST

Avtar The Way Of Water: केटच्या लूकबद्दल कोणताही खुलासा करण्यात आला नाही. केटच्या नव्या स्टाईलमधील लूकमुळे चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.

जेम्स कॅमेरूनन (James Cameron)ने मे महिन्यात 'अवतार'चा सीक्वेल 'अवतार: द वे ऑफ वॉटर'(Avatar The Way of Water) चा टीझर रिलीज केला होता. 105 सेकंदाच्या टीझरमध्ये चित्रपटाची झलक पाहायला मिळाली. या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. आता या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणारी अभिनेत्री केट विन्सलेट(Kate Winslet) चा फर्स्ट लूक आता समोर आला आहे. 'एम्पायर मॅगझिन'च्या खास कव्हर पेजवर अभिनेत्री केटच्या लूकवर  दाखवण्यात आला आहे. एक नवी योद्धा म्हणून केट विन्सलेटचा फर्स्ट लूक पाहून चाहते इम्प्रेस झाले आहेत.

'अवतार: द वे ऑफ वॉटर'मध्ये केट विन्सलेट रोनल नावाच्या योद्धाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये 'अवतार'च्या निर्मात्यांनी तिला वेगळ्या अवतारात दाखवणार आहेत. मे महिन्यात या चित्रपटाचा ट्रेलर आला तेव्हा केट देखील दिसली होती, परंतु तिच्या लूकबद्दल कोणताही खुलासा करण्यात आला नाही. केटच्या नव्या स्टाईलमधील लूकमुळे चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.

जेम्स कॅमेरॉन-केट विन्सलेट २६ वर्षांनंतर एकत्र2009 मध्ये आलेल्या 'अवतार'च्या सिक्वेलची घोषणा त्याचवेळी करण्यात आली होती पण त्याचा सिक्वेल आणण्यासाठी जेम्स कॅमेरूनला तब्बल 13 वर्षे लागली. जेम्स आणि केट विन्सलेट 26 वर्षांनंतर एकत्र आले आहेत. एका मुलाखतीत केटने सांगितले होते की, 'या चित्रपटासाठी मी पाण्याखाली बराच वेळ श्वास रोखून ठेवण्याची कला शिकली आहे'. अभिनेत्रीला नव्या लूकमध्ये पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

16 डिसेंबर 2022 रिलीज होणार सिनेमाकेट विन्सलेट व्यतिरिक्त 'अवतार: द वे ऑफ वॉटर'मध्ये सॅम वर्थिंग्टन, जो सालडाना, स्टीफन लँग, मिशेल रॉड्रिग्ज, विन डिझेल हे कलाकार आहेत. जेम्स कॅमेरॉनचा हा चित्रपट 16 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :हॉलिवूड