Enrique Iglesias: प्रसिद्ध हॉलिवूड पॉप सिंगर एनरिके इग्लेसियस त्याच्या गाण्यांसाठी चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. दरम्यान, ग्लोबल सुपरस्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हा गायक १३ वर्षांनी मुंबईत परतला. नुकताच त्याचा म्युझिक कॉन्सर्ट मुंबईत आयोजित करण्यात आला होता. त्याच्या या कॉन्सर्टला जवळपास २५ हजारांहून अधिक प्रेक्षक आणि सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. तर काहींनी त्याच्या सुपरहिट गाण्यांवर ठेका देखील धरला. हा कॉन्सर्ट उत्तम पद्धतीने पार पडला. मात्र, आता त्याबद्दल आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.
अलिकडेच एनरिक इग्लेसियसने २९-३० ऑक्टोबर रोजी मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये लाईव्ह कॉन्सर्ट केला. मात्र, त्याच्या या कार्यक्रमाला गालबोट लागलं आहे.या कॉन्सर्ट संदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे. गायन रसिकांनी खचाखच भरलेल्या या कॉन्सर्टमध्ये तब्बल २३ लाख रुपयांच्या किंमतीचे ७३ मोबाईल चोरी झाल्याची घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला असून सदर घटनेचा तपास पोलिस करत आहेत.
दरम्यान, कॉन्सर्टमध्ये मलायका अरोरा , सोनल चौहान, रकुल प्रीत सिंग, रुबिना दिलाइक ते राहुल वैद्य आणि गुरमीत चौधरी असे अनेक सेलेब्रिटी देखील या कॉन्सर्टमध्ये सहभागी झाले होते. त्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याशिवाय काही मेकअप आर्टिस्टपासून काही दिग्गज व्यावसायिक देखील यादरम्यान उपस्थित होते.
मिळालेल्या माहितीनुसार, पॉप सिंगर एनरिक इग्लेसियसच्या कॉन्सर्टच्या एका तिकीटाची किंमत साधारण ७ रुपये इतकी होती. या कॉन्सर्टमध्ये त्याने ९० मिनिटं परफॉर्मन्स केला. शिवाय आपल्या सुरेल गायनाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. मात्र, चोरीच्या घटनेमुळे त्याचे चाहते प्रचंड नाराज आहेत.
Web Summary : Enrique Iglesias' Mumbai concert, attended by thousands, was marred by the theft of 73 mobile phones worth ₹23 lakhs. Police are investigating the incident that occurred amidst the lively performance.
Web Summary : एनरिक इग्लेसियस के मुंबई कंसर्ट में हजारों लोगों ने भाग लिया, लेकिन 23 लाख रुपये के 73 मोबाइल फोन की चोरी हो गई। पुलिस घटना की जांच कर रही है जो जीवंत प्रदर्शन के बीच हुई।