Join us
Daily Top 2Weekly Top 5

लग्नानंतर सुरभी ज्योतीने सासरी पहिल्यांदा बनवला 'हा' खास पदार्थ; फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2024 11:47 IST

'कुबूल है' फेम अभिनेत्री सुरभी ज्योतीने लग्नानंतर सासरच्या मंडळींसाठी खास गोड पदार्थ बनवला आहे.

Surbhi Jyoti: झी टीव्ही वाहिनीवरील 'कुबूल है' या मालिकेत जोया नावाचं पात्र साकारून अभिनेत्री सुरभी ज्योती (Surbhi Jyoti) घराघरात पोहचली. या मालिकेने खऱ्या अर्थाने तिला ओळख मिळवून दिली. सुरभी ज्योती ही हिंदी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. नुकतीच अभिनेत्रीने २७ ऑक्टोबरच्या दिवशी लग्नगाठ बांधली. सुरभी तिचा बॉयफ्रेंड सुमित सुरीसोबत लग्नबंधनात अडकली. निसर्गाच्या सानिध्यात तिचा विवाहसोहळा पार पडला. त्यांच्या लग्नाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली. 

सुरभीने बनवला 'हा' खास गोड पदार्थ

सुरभी सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असते. तिचे लग्नापूर्वीच्या विधी ते लग्नातील फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत तिने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. नुकतेच अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिचे काही फोटो पोस्ट केले आहेत. "पहली रसोई" असं कॅप्शन देत अभिनेत्रीने तिचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. लग्नाच्या चार दिवसानंतर सुरभीने सासरच्या मंडळींसाठी गोड हलवा बनवलाय. फोटोंमध्ये नववधू सुरभीने निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. शिवाय हातात लाल चुडा, गळ्यात मंगलसुत्र तिने घातलं आहे. एक मजेशीर गोष्ट म्हणजे अभिनेत्रीने पहिल्यांदा हलवा बनवून पती सुमितला खाऊ घातलाय. सुरभी किचनमध्ये असताना सुमितही तिच्यासोबत पाहायला मिळतोय. या जोडप्याचे हे फोटो पाहून चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

टॅग्स :टिव्ही कलाकारसोशल मीडियाव्हायरल फोटोज्