Join us

हातात युरीन बॅग अन्...; कॅन्सरशी लढा देणाऱ्या हिना खानचा मन सुन्न करणारा फोटो, चाहते चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 15:27 IST

हिना तिच्या उपचाराबाबत चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून अपडेट देताना दिसते. व्हॅकेशनवरुन परतल्यानंतर आता हिना पुन्हा कॅन्सरवर उपचार घेत आहे. तिने हॉस्पिटलमधील एक फोटो शेअर केला आहे. 

टीव्ही अभिनेत्री हिना खान कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा सामना करत आहे. हिनाला ब्रेस्ट कॅन्सर आहे. सध्या ती कॅन्सरवर उपचार घेत असून या आजाराशी मोठ्या धीराने लढा देत आहे. हिना तिच्या उपचाराबाबत चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून अपडेट देताना दिसते. व्हॅकेशनवरुन परतल्यानंतर आता हिना पुन्हा कॅन्सरवर उपचार घेत आहे. तिने हॉस्पिटलमधील एक फोटो शेअर केला आहे. 

हिनाने कॅन्सरवरील उपचारादरम्यानचा हॉस्पिटलमधील एक फोटो तिच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. या फोटोमध्ये हिनाच्या हातात युरीन बॅग असल्याचं दिसत आहे. हा पाठमोरा फोटो शेअर करत हिनाने "या उपचारांच्या दरवाजामधून प्रकाशाकडे निघाली आहे...एका वेळी एक पाऊल...प्रार्थना", असं म्हटलं आहे. हिनाचा हा फोटो मन सुन्न करणारा आहे. तिचा हा फोटो पाहून चाहते चिंतेत आहेत. 

हिनाच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत अभिनेत्रीविषयी काळजी व्यक्त केली आहे. तर काही सेलिब्रिटींनी तिला यातून बरं होण्यासाठी प्रार्थना करत असल्याचं म्हटलं आहे. मराठी अभिनेत्री क्षिती जोगने कमेंट करत "फक्त वेळेची गोष्ट आहे" असं म्हणत हिनाला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. 

कॅन्सरवरील उपचार म्हणून हिनाची केमोथेरेपी सुरू आहे. या आजाराचा ती खूप धैर्याने सामना करत असून चाहत्यांपुढे आदर्श ठेवत आहे. हिनाने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेतून ती घराघरात पोहोचली. 'कसौटी जिंदगी की' या मालिकेत ती खलनायिकेच्या भूमिकेत दिसली होती. तर अनेक वेब सीरिजमध्येही ती झळकली आहे. 

टॅग्स :हिना खानकर्करोगटिव्ही कलाकार