Join us
Daily Top 2Weekly Top 5

कान्सनंतर बॉयफ्रेंड रॉकी जयस्वालसोबत व्हॅकेशनसाठी मिलानला गेली हिना खान, पहा त्यांचे रोमँटिक फोटोज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2019 12:22 IST

कान्समध्ये पहिल्यांदाच हिना खानने हजेरी लावली होती. त्यानंतर आता ती बॉयफ्रेंड रॉकी जयस्वालसोबत मिलान येथे गेली आहे.

छोट्या पडद्यावरील हॉट अभिनेत्री हिना खानने यावर्षी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पहिल्यांदाच हजेरी लावली होती. या फेस्टिव्हलमध्ये तिने तिच्या अंदाजाने सर्वांना चांगलीच भुरळ पाडली. त्यानंतर आता ती तिचा बॉयफ्रेंड रॉकी जयस्वालसोबत मिलान येथे गेली आहे. तिथले तिने फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे हिनाचे ड्रीम व्हॅकेशन आहे. या फोटोंमध्ये ती रोमँटिक अंदाजात पहायला मिळते आहे.

हिना खानने बॉयफ्रेंड रॉकी जयस्वालसोबत फोटो स्टोरीमध्ये शेअर करीत लिहिले की, सम पॅपेरिंग (थोडेसे लाड). 

तर रॉकी जयस्वालने देखील हिनासोबतचे फोटो सोशल मीडियावर स्टोरीमध्ये शेअर करीत लिहिले की. मिलानमध्ये आपल्या जानसोबत. 

हिना खानने कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये तिचा आगामी चित्रपट लाइन्सचा पहिला पोस्टर लाँच केला. यावेळी ती रेड कार्पेटवर देखील रॅम्प वॉक करताना दिसली.

कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर रॅम्पवॉक करताना कुठेही कमी पडली नाही. याशिवाय हिना खानने बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा व तिचा नवरा निक जोनाससोबत सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले. इतकेच नाही तर तिने प्रियंका चोप्रासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करीत एक भावुक पोस्टदेखील लिहिली होती. 

हिनाने या शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, या फेस्टिव्हल दरम्यान प्रियंका ज्या कोणाला भेटवत होती त्यांना सांगताना स्टार असे संबोधीत होती. याशिवाय प्रियंका हिना खानच्या पदार्पण सिनेमाविषयी सांगण्याबाबत अजिबात विसरत नव्हती. माझ्या करीयरमधील ही खूप मोठी संधी आहे. 

हिना खानने स्टार प्लस वाहिनीवरील ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते.

या मालिकेत तिने अक्षराची भूमिका साकारली होती. या भूमिकेतून तिने घराघरात आपली ओळख निर्माण केली होती.

टॅग्स :हिना खानकान्स फिल्म फेस्टिवल