Join us

22 वर्षांचा लग्न मोडून हिमेश रेशमियाने थाटला दुसरा संसार, पण का संपलं पहिलं नातं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 16:29 IST

हिमेश जितका त्याच्या करिअरमुळे चर्चेत असतो तितकेच त्याच्या खासगी आयुष्यामुळेही एकेकाळी खूप चर्चेत होता

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या ‘प्यार किया तो डरना क्‍या’ या चित्रपटाच्या माध्यमातून हिमेश रेशमियानं आपल्या करियरची सुरुवात केली होती. ‘आशिक बनाया आपने’, ‘झलक दिखला जा’ अशी सुपरहिट गाणी हिमेश रेशमियाची प्रचंड गाजली होती. आजही हिमेशच्या गाण्यांची जादू कमी झालेली नाही.आज हिमेश जितका त्याच्या करिअरमुळे चर्चेत असतो तितकेच त्याच्या खासगी आयुष्यामुळेही  एकेकाळी खूप चर्चेत होता. त्याने कोमलसोबत 22 वर्षांचे नाते संपवले आणि आपल्या मैत्रिणीशी लग्न केले. हिमेश आणि त्याची दुसरी पत्नी सोनिया कपूर यांच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे.  यानिमित्ताने जाणून घेऊया हिमेश आणि कोमल यांचा 22 वर्षांचा संसार का मोडला.

हिमेश रेशमिया आणि कोमलचे लग्न 1995 मध्ये झाले होते. लग्नाच्या 22 वर्षानंतर दोघांचा घटस्फोट झाला. हिमेशची सोनिया कपूरशी जवळीक वाढल्याने कोमल आणि हिमेशचे नाते नाजूक झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. पण कोमलने एका मुलाखतीत यावर खुलासा केला होता.

एका मुलाखतीत कोमल म्हणाली, आम्ही एकमेकांचा सन्मान करतो. आमचा घटस्फोट हा आमच्याच खासगी कारणांमुळे झाल्याचे कोमलने सांगितले होते. या प्रकरणात इतर कोणालाही आणू नये आणि त्याला कोणीही जबाबदार नाही. याला सोनिया जबाबदार नाही आणि आमचा मुलगा आणि कुटुंबीय सोनियावर कुटुंबातील सदस्यासारखे प्रेम करतात.

कित्येक वर्ष हिमेश सोनियासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिला होता. सोनिया कपूरही टीव्ही अभिनेत्री असून तिने काही सिनेमांमध्येही काम केले आहे. सोनियाने आतापर्यंत ‘कभी कभी’, ‘कुसुम’, ‘कभी हां, कभी ना’, ‘परिवार’ आणि ‘कैसा ये प्यार है’ या मालिकांमध्ये काम केले आहे. ‘फरेब’, ‘ऑफिसर’, ‘सत्ता’ या सिनेमांमध्येही तिने काम केले आहे. 

टॅग्स :हिमेश रेशमियाबॉलिवूड