Himanshi Khurana : अभिनेत्री हिमांशी खुराना हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. हिमांशी खुरानाची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. अशातच तिच्या चाहत्यांना चिंतेत टाकणारी बातमी समोर आली आहे. हिमांशी खुराणा रुग्णालयात दाखल झाली आहे. याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत, जे पाहून चाहते तिच्या तब्यतेविषयी काळजी व्यक्त करत आहेत.
हिमांशी खुरानाने तिचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती हॉस्पिटलच्या बेडवर दिसत आहे. हिमांशीने तिला रुग्णालयात का दाखल करण्यात आले आहे हे सांगितलेले नाही. हिमांशीची तब्येत बिघडण्याची ही पहिलीच वेळ नाही. PCOS चा त्रास असल्यामुळे ती आजारी पडत असते. याचा तिच्या कामावरही परिणाम झाला होता.
हिमांशी खुराना ही 'बिग बॉस 13' मध्ये सहभागी झाली होती. पण, ती गेमपेक्षा आसिमसोबत नात्यामुळे जास्त चर्चेत आली होती. आसिम आणि हिमांशी खुराना यांची लव्ह स्टोरी ही 'बिग बॉस'च्या घरात सुरू झाली होती. 'बिग बॉस'नंतर अनेक वर्षे एकमेकांना डेट केलं. मात्र, अचानकपणे त्यांच्या ब्रेकअपची चर्चा ही रंगताना दिसली.