Join us
Daily Top 2Weekly Top 5

अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांची पुन्हा हेराफेरी, कधी होणार रिलीज?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2018 13:40 IST

'हेराफेरी' आणि 'फिर हेराफेरी' या सिनेमांनी प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं होतं. आजही या सिनेमांची क्रेझ प्रेक्षकांमध्ये बघायला मिळते. 

मुंबई : बऱ्याच वर्षांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल हे त्रिकुट मोठ्या पडद्यावर हेराफेरी करण्यासाठी सज्ज झाले आहेत. 'हेराफेरी' आणि 'फिर हेराफेरी' या सिनेमांनी प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं होतं. आजही या सिनेमांची क्रेझ प्रेक्षकांमध्ये बघायला मिळते. 

मीडिया रिपोर्टनुसार, 'हेरा फेरी 3' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा सिनेमा 2019 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पण या सिनेमाची रिलीज डेट फायनल करण्यात आली नाहीये. पण प्रॉडक्शन हाऊसने तयारी सुरु केली आहे. या सिनेमासाठी अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांना साईन करण्यात आलं आहे. फक्त अभिनेत्रींनी निवड होणं शिल्लक आहे. 

इंद्र कुमार हे या सिनेमाचं दिग्दर्शन करणार असल्याचं बोललं जात आहे. 2019 मध्ये या सिनेमासोबतच अक्षय कुमारचे आणखी दोन सिनेमे रिलीज होणार आहेत. यात केसरी आणि हाऊसफुल 4 यांचा समावेश आहे. तर काही दिवसांपूर्वी या सिनेमासाठी अभिषेक बच्चन आणि जॉन अब्राहम यांचंही नाव चर्चेत होतं. पण काही कारणामुळे ते या सिनेमातून बाहेर झालेत. 

टॅग्स :अक्षय कुमारबॉलिवूड