Join us
Daily Top 2Weekly Top 5

पिक्चर अभी बाकी है! 'झिम्मा २'च्या सक्सेसनंतर हेमंत ढोमेची पोस्ट, म्हणाला, "मोठ्या हिंदी सिनेमांसमोर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 15:04 IST

'झिम्मा २' तिसऱ्या आठवड्यातही बॉक्स ऑफिस गाजवत आहे. बिग बजेट बॉलिवूड सिनेमे प्रदर्शित होऊनही 'झिम्मा २'ची क्रेझ तसूभरही कमी झालेली नाही.

हेमंत ढोमे दिग्दर्शित 'झिम्मा २' या मराठी सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. बहुचर्चित असलेला मराठी सिनेमा २४ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमाने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. पहिल्या दिवसापासूनच 'झिम्मा २' पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहेत. सिनेमागृहात 'झिम्मा २'च्या शोला ठिकठिकाणी हाऊसफुलचे बोर्ड लागत आहेत. 'झिम्मा २'चं यश पाहून हेमंत ढोमेने खास पोस्ट शेअर केली आहे. 

'झिम्मा २' तिसऱ्या आठवड्यातही बॉक्स ऑफिस गाजवत आहे. बिग बजेट बॉलिवूड सिनेमे प्रदर्शित होऊनही 'झिम्मा २'ची क्रेझ तसूभरही कमी झालेली नाही. 'झिम्मा २'ला मिळणारा प्रतिसाद पाहून हेमंत ढोमेही भारावून गेला आहे. त्याने याबाबत एक पोस्टही शेअर केली आहे. "प्रेक्षकांचा प्रतिसाद भारावून टाकणारा आहे...मोठ्या हिंदी सिनेमांसमोर आपला 'झिम्मा २' पाय रोवून उभा आहे आणि प्रचंड गाजतोय, तो केवळ आणि केवळ तुमच्या प्रेमामुळे…आता लवकरच तिसरा आठवडा सुरू होतोय…पिक्चर अभी बाकी है…", असं हेमंत ढोमेने पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

२०२१ साली प्रदर्शित झालेल्या 'झिम्मा' या चित्रपटाचा 'झिम्मा २' सिक्वल आहे. सात बायकांच्या रियुनियनची धमाल गोष्ट या सिनेमातून मांडण्यात आली आहे. या सिनेमात सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, निर्मिती सावंत, क्षिती जोग, सायली संजीव, शिवानी सुर्वे, रिंकू राजगुरू आणि सिद्धार्थ चांदेकर या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या सिनेमाने पहिल्या आठवड्यात ७.३८ कोटींचा गल्ला जमवला आहे. 

टॅग्स :मराठी चित्रपटमराठी अभिनेतासिद्धार्थ चांदेकर