Join us

दाभाडे फॅमिली बॉक्स ऑफिसवर 'फसक्लास'! हेमंत ढोमेच्या सिनेमाने तीन दिवसांतच केली बंपर कमाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 16:49 IST

'फसक्लास दाभाडे' सिनेमाचं तीन दिवसांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. 

हेमंत ढोमेचं दिग्दर्शन असलेला 'फसक्लास दाभाडे' हा सिनेमा नुकताच सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. एक परिपूर्ण कुटुंब आणि मनोरंजनाची मेजवानी असलेला हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. प्रदर्शनाच्या दिवसापासूनच सिनेमाचे शोज ठिकठिकाणी हाऊसफूल होत आहेत. 'फसक्लास दाभाडे' सिनेमाचं तीन दिवसांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. 

'फसक्लास दाभाडे' सिनेमा २४ जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित झाला. या सिनेमाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. सॅकनिल्कने दिलेल्या रिपोर्टनुसार, 'फसक्लास दाभाडे'ने प्रदर्शनाच्या दिवशी २८ लाख रुपये कमावले. त्यानंतर शनिवारी आणि रविवारी सिनेमाच्या कमाईत वाढ झाल्याचं दिसून आलं. दुसऱ्या दिवशी 'फसक्लास दाभाडे'ने ४९ लाख रुपयांची कमाई केली. तर पहिल्या रविवारी ७२ लाख रुपये कमावले. म्हणजेच तीनच दिवसांत 'फसक्लास दाभाडे' सिनेमाने १.४९ कोटींचा गल्ला बॉक्स ऑफिसवर जमवला आहे. 

'फसक्लास दाभाडे'मध्ये कलाकारांची फौज

हेमंत ढोमेचं लेखन आणि दिग्दर्शन असलेल्या 'फसक्लास दाभाडे' सिनेमात सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, अमेय वाघ, निवेदिता सराफ, हरीश दुधाडे, उषा नाडकर्णी, राजन भिसे या कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत.

टॅग्स :Hemant Dhome Today Newsसिनेमामराठी अभिनेतासिद्धार्थ चांदेकर