Join us

'ही' गोष्ट ऐकून रवी दुबे गेले होता चक्रावून

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2018 06:00 IST

नवरात्राचा उत्सव अगदी वैशिष्ट्यपूर्ण पध्दतीने साजरा करण्यासाठी ‘स्टार प्लस’वरील ‘दांडिया नाईटस’ या कार्यक्रमाने टीव्हीवरील अनेक लोकप्रिय कलाकारांना एकत्र आणले आहे

ठळक मुद्देआफ्रो नृत्य टीव्हीवर रवी दुबे सादर करणार आहे

नवरात्राचा उत्सव अगदी वैशिष्ट्यपूर्ण पध्दतीने साजरा करण्यासाठी ‘स्टार प्लस’वरील ‘दांडिया नाईटस’ या कार्यक्रमाने टीव्हीवरील अनेक लोकप्रिय कलाकारांना एकत्र आणले आहे. या कलाकारांनी आपले वैशिष्ट्यपूर्ण नृत्याने दांडियाला वेगळीच झालर दिली आहे. असेच एक आफ्रो नृत्य अभिनेता रवी दुबेने सादर केले.

रवी दुबेने म्हणाला, “नवरात्र आणि दसरा हे दोन सण एकत्रितपणे साजरे करण्याची संधी देणाऱ्या ‘स्टार प्लस’वरील ‘दांडिया नाईटस’ या कार्यक्रमात मला सहभागी होता आलं, याचा मला खूप आनंद वाटतो. या कार्यक्रमात मला एक नृत्य सादर करायचं होतं आणि त्यासाठी मला तब्बल आठ नकली टॅटू अंगावर लावावे लागतील, हे ऐकून मी चक्रावलो होतो. मी आजवर कोणत्याही कार्यक्रमात असा वेश धारण केलेला नव्हता. या टॅटूंमुळे माझा चेहरा अगदी बदलून जाणार होता. पण या आफ्रो दांडिया नृत्याने मला एक प्रकारचं आव्हान दिलं आणि आपण काहीतरी नवं आणि वैशिष्ट्यपूर्ण करीत असल्याची सुखद जाणीव करून दिली. यावेळी मी प्रथमच आफ्रो आणि दांडिया या नृत्यप्रकारांचा संगम घडविणार होतो. माझं नृत्यकौशल्य सादर करण्यासाठी दांडियासारखा दुसरा योग्य कार्यक्रम कोणता असणार! माझ्याप्रमाणेच प्रेक्षकांना हे नृत्य पाहताना आनंद वाटेल, अशी आशा करतो.”

सनाया इराणी, जय भानुशाली आणि किकू सारडा या देशातील तीन  विनोदी सूत्रसंचालकांकडे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देण्यात आले आहे. टीव्हीवरील नेहमीचे लोकप्रिय कलाकार यात आगळी नृत्ये सादर करताना पाहून प्रेक्षकांना नक्कीच उत्सुकता वाटेल.

टॅग्स :रवि दुबेस्टार प्लस