Join us
Daily Top 2Weekly Top 5

Prajakta Maliचा फॅमिली फोटो पाहिलंत का?, पाहा कोण-कोण आहे तिच्या कुटुंबात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2022 07:00 IST

कलाकार म्हटलं की त्यांचे चाहते आलेच...कलाकारांच्या प्रोफेशनल लाइफसोबत त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते खूपच उत्सुक असतात.

कलाकार म्हटलं की त्यांचे चाहते आलेच...कलाकारांच्या प्रोफेशनल लाइफसोबत त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते खूपच उत्सुक असतात. तसेच त्यांच्या कारकीर्द आणि कुटुंबाबद्दल जाणून घ्यायला खूप उत्सुक असतात. आज आम्ही तुम्हाला मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी(Prajakta Mali)च्या कुटुंबातील सदस्यांबद्दल सांगणार आहोत.

प्राजक्ता माळी जुळून येती रेशीमगाठी या मालिकेतून घराघरात पोहचली. तिने मालिका, चित्रपटात विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केले आहे. दिवसेंदिवस प्राजक्ताच्या फॅन्सच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. प्राजक्ता सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांना अपडेट देत असते. प्राजक्ताने नुकतेच सोशल मीडियावर दिवाळीच्या निमित्ताने फॅमिली फोटो शेअर केला आहे. या फोटोत तिचे आई-बाबा, दादा वहिनी आणि तिच्या दोन भाच्या पाहायला मिळत आहे. तिने हे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, दिवाळीनिमित्ताने अनिवार्य पोस्ट. तिच्या या फोटोंना चाहत्यांची खूप पसंती मिळताना दिसते आहे. 

प्राजक्ताच्या या फोटोंवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. एका चाहत्याने म्हटले की, प्राजू तुझे सुंदर कुटुंब आहे हे पाहून मला आनंद झाला, तुला आणि तुझ्या कुटुंबाला शुभेच्छा तुम्हाला आणि तुमच्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. राणी.खरी पुणे दिवाळी आणि तिथल्या कुटुंबाला जय भवानी. जय शिवाजी जय हिंद, जय महाराष्ट्र. तर त्याच युजरने आणखी एक कमेंट लिहिली की, प्राजू तुला सोबत पाहून खूप आनंद झाला तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत दिवाळीचा सण साजरा करताना पाहण्यासाठी तुम्ही नेहमी तुमच्या कुटुंबापासून दूर आणि शूटिंगमध्ये व्यस्त हे पाहून मला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि नवीन वर्ष भरभराटीचे जावो. भविष्यात माझ्या आयुष्यात लवकरच तुला भेटण्याची आशा आहे माझ्या सर्वात गोड हृदय. राणी.

या पोस्टवर चाहते दिवाळीच्या शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. यापूर्वीही प्राजक्ताने कुटुंबासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यांनाही चाहत्यांची पसंती मिळताना दिसते. प्राजक्ता माळीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती शेवटची लकडाउन चित्रपटात अंकुश चौधरीसोबत दिसली होती. सध्या ती महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात पाहायला मिळत आहे.

टॅग्स :प्राजक्ता माळी