Join us
Daily Top 2Weekly Top 5

अशोक सराफ यांच्या सख्ख्या धाकट्या भावाला पाहिलंत का?, प्रसिद्धीपासून राहतात खूप दूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2023 12:38 IST

Ashok Saraf : अशोक सराफ यांचे सख्खे बंधू काय करतात? निवेदिता सराफ यांनी या दोघांचा एक लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) अर्थात अशोक मामा यांच्या परिचयाची गरज नाही. मालिका, नाटक, चित्रपट या तिन्ही माध्यमातून त्यांनी खूप मोठा चाहता वर्ग कमावला आहे. मराठी प्रेक्षकांसोबत त्यांची नाळ इतकी घट्ट जुळली आहे की त्यांचा प्रत्येक चाहता 'अशोक मामा' असेच त्यांना संबोधतात. अशोक यांच्या पत्नी निवेदिता सराफ (Nivedita Saraf) प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. सध्या त्या कलर्स मराठीवरील 'भाग्य दिले तू मला' या मालिकेत काम करत आहेत. परंतु तुम्हाला अशोक सराफ यांच्या भावाबद्दल माहिती आहे का?, नाही. तर याबद्दल जाणून घेऊयात.

अशोक सराफ यांच्या धाकट्या भावाचे नाव आहे सुभाष सराफ आणि ते प्रसिद्धीपासून खूप दूर आहेत. सुभाष यांची चर्चा होण्याचे कारण म्हणजे निवेदिता सराफ यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात अशोक आणि सुभाष एकाच फ्रेममध्ये पाहायला मिळत आहेत. त्यांनी हा फोटो शेअर करताना 'बेस्ट ब्रदर्स' असे कॅप्शन दिले आहे. नेहमीप्रमाणे अशोक सराफ यांच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. 

अशोक सराफ यांचे धाकटे भाऊ सुभाष हे कलाविश्वापासून दूर वेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत. ते व्यवसायाने सीए असून गेली अनेक वर्ष ते मुंबईत कार्यरत आहेत. अशोक मामांना त्यांच्या करिअरमध्ये त्यांच्या भावाचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. सोशल मीडियावर त्यांचे एकत्र असे खूप कमी फोटो आहेत. त्यामुळे निवेदिता यांनी शेअर केलेल्या फोटोवर खूप कमेंट येत आहेत.

मागील वर्षी अशोक आणि सुभाष 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर एकत्र दिसले होते. HIVग्रस्त मुलांसाठी काम करणार्‍या अन् त्यांना आधार देणार्‍या प्रभा-हिरा प्रतिष्ठान संचलित 'पालवी' या सेवाभावी संस्थेसाठी या दोघांनी कोण होणार करोडपतीचा खेळ खेळला. या कार्यक्रमात दोघांनीही त्यांच्या बऱ्याच आठवणींना उजाळा दिला होता.

टॅग्स :अशोक सराफनिवेदिता सराफ