Join us
Daily Top 2Weekly Top 5

भारतीशी लग्न करून हर्षला पश्चाताप? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 10:26 IST

‘हुनरबाज : देश की शान’ या शोचे सूत्रसंचालन करणारी टीव्ही क्षेत्रातील सर्वात पहिली फिमेल कॉमेडियन भारती सिंहने हर्ष लिंबाचियाशी लग्न केले आहे

‘हुनरबाज : देश की शान’ या शोचे सूत्रसंचालन करणारी टीव्ही क्षेत्रातील सर्वात पहिली फिमेल कॉमेडियन भारती सिंहने हर्ष लिंबाचियाशी लग्न केले आहे. आता भारती लवकरच आई होणार आहे. भारती प्रेग्नंट असताना ते दोघे यूट्यूबवर ‘LOL’ (लाइफ ऑफ लिंबाचिया) हा शो देखील करताना दिसत आहेत. यामध्ये दोघेही होणाऱ्या बाळाविषयी एकमेकांना मजेशीर अंदाजात प्रश्न विचारताना दिसत आहेत. हर्षने भारतीशी लग्न केल्याचा पश्चाताप होत आहे असे म्हटले आहे.

बाळ कोणासारखे दिसायला हवे, असा प्रश्न विचारण्यात येतो. तेव्हा हर्ष स्वत:चे नाव घेतो. ते ऐकून भारती हर्षच्या वजनाची खिल्ली उडवते. त्यावर हर्ष लगेच बॉडी शेमिंग करणे योग्य नाही असे म्हणतो. पण गुड लूक्ससाठी मुलगा माझ्यासारखा दिसायला हवा असे म्हटले आहे.

भारतीला ते ऐकून राग येतो आणि ती ‘जर माझे वजन इतके आहे, मी चांगली नाही तर माझ्याशी लग्न का केले?’ असे विचारते, त्यावर हर्ष ‘मूर्ख, माझे डोकं फिरले होते. आज मला पश्चाताप होत आहे’ असे म्हणतो.

टॅग्स :भारती सिंगटेलिव्हिजन