Join us

देबिना बॅनर्जीने दाखवली मुलगी लियानाची पहिली झलक; पाहा स्टार कपलचा गोड फॅमिली फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2022 14:11 IST

Debina Bonnerjee : कोणालाही प्रेमात पाडेल इतकी गोड दिसतेय गुरमीत चौधरी आणि देबिना बॅनर्जीची मुलगी लियाना.

Gurmeet Choudhary Debina Bonnerjee Baby Pic: टीव्हीचा लोकप्रिय अभिनेता गुरमीत चौधरी व अभिनेत्री देबिना बॅनर्जी आईबाबा झालेत. सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत या स्टार कपलने मुलगी झाल्याची आनंदाची बातमी दिली आहे. देबिनाने ३ एप्रिलला एक गोंडस मुलीला जन्म दिला. सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत देबिना आणि गुरमीत दोघांनी ही आपल्या बाळाची पहिली झलक दाखवली होती. मात्र यात त्याने मुलीचा चेहरा दाखवला नव्हता. 

आणि देबिना आपल्या मुलीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. मात्र आजपर्यंत त्यांनी मुलगी लियानाचा चेहरा दाखवला नव्हता. अलीकडेच, गुरमीत आणि देबिना या जोडीने मुलगी लियानाचा पहिला फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांच्या मुलीचा झलक दाखवली आहे. देबिनाने शेअर केलेल्या फॅमिली फोटोमध्ये ती, तिचा नवरा अभिनेता गुरमीत चौधरी आणि त्यांच्या मुलगी लियाना दिसून येत आहे. देबिनाने शेअर केलेल्या या फोटोवर अनेक सेलिब्रिटींसह चाहते देखील लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतायेत.  

छोट्या पडद्यावर गाजलेल्या ‘रामायण’ या मालिकेत गुरमीत चौधरीने प्रभू श्रीरामाची तर त्याची पत्नी देबिनाने सीता मातेची भूमिका साकारली होती. या मालिकेच्या सेटवर ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. 2006 मध्ये देबिना व गुरमीत यांनी घरून पळून जाऊन लग्न केलं होतं. गुरमीतने या लग्नाचे काही फोटो शेअर केले होते. यानंतर 2011 साली गुरमीत व देबिना यांनी पुन्हा लग्न केलं. कुटुंबीयांच्या उपस्थितीत नोंदणी पद्धतीनं हे लग्न पार पडलं होतं.

टॅग्स :गुरमीत चौधरीटिव्ही कलाकार