Join us
Daily Top 2Weekly Top 5

२०२५ चे हे गाजलेले मराठी सिनेमे ओटीटीवर रिलीज, वीकेंडला सहकुटुंब घ्या आनंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 12:27 IST

२०२५ या वर्षात गाजलेले तीन मराठी सिनेमे ओटीटीवर रिलीज झाले आहेत. कुठे पाहू शकता, बातमीवर क्लिक करुन जाणून घ्या

२०२५ हे वर्ष मराठी सिनेमांसाठी चांगलं म्हणता येईल. या वर्षात एकापेक्षा एक मराठी सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले. २०२५ या वर्षी आलेल्या मराठी सिनेमांनी बॉक्स ऑफिसवरही चांगली कामगिरी केली. २०२५ मधील गाजलेले हेच मराठी सिनेमा आता ओटीटीवर रिलीज झाले आहेत. त्यामुळे या वीकेंडला प्रेक्षकांना हे सिनेमे घरबसल्या पाहण्याची संधी मिळणार आहे. जाणून घ्या कोणते सिनेमे कोणत्या ओटीटीवर रिलीज झाले आहेत.

हे तीन मराठी सिनेमे ओटीटीवर रिलीज

२०२५ मध्ये गाजलेले 'सुशीला सुजीत', 'देवमाणूस' आणि 'गुलकंद' हे तीन मराठी सिनेमे आता ओटीटीवर रिलीज झाले आहेत. 'सुशीला सुजीत', 'देवमाणूस' आणि 'गुलकंद' या तिन्ही विषयांचे विषय वेगळे आहेत. हे तिन्ही सिनेमे प्राइम व्हिडीओवर रिलीज झाले आहेत. यापैकी 'सुशीला सुजीत' हा सिनेमा प्राइम व्हिडीओवर पाहायला उपलब्ध आहे. तर 'देवमाणूस' आणि 'गुलकंद' हे दोन सिनेमे सध्या प्राइम व्हिडीओवर रेंटवर उपलब्ध आहेत. अशाप्रकारे या वीकेंडला प्रेक्षकांना सहकुटुंब सहपरिवार हे सुपरहिट सिनेमे बघायला मिळणार आहेत.

तीनही सिनेमांबद्दल

'सुशीला सुजीत' हा सिनेमा प्रसाद ओकने दिग्दर्शित केला होता. या सिनेमात स्वप्नील जोशी आणि सोनाली कुलकर्णी प्रमुख भूमिकेत होते. सिनेमाच्या वेगळ्या कथानकामुळे हा सिनेमा चांगलाच गाजला. 'देवमाणूस' हा सिनेमाही चांगलाच गाजला. या सिनेमात महेश मांजरेकर, रेणुका शहाणे आणि सिद्धार्थ बोडके यांनी प्रमुख भूमिका साकारल्या. दुसरीकडे १ मे २०२५ ला रिलीज झालेला 'गुलकंद' सिनेमा रिलीज झाला. सचिन गोस्वामींनी हा सिनेमा दिग्दर्शित केला. या सिनेमात प्रसाद ओक, सई ताम्हणकर, समीर चौगुले, ईशा डे यांची सिनेमात प्रमुख भूमिका आहे.

टॅग्स :मराठी चित्रपटअ‍ॅमेझॉनप्रसाद ओक सई ताम्हणकर