Join us
Daily Top 2Weekly Top 5

रिंकू राजगुरू, अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णीसह या मराठी कलाकारांनी दिल्या गुढीपाडवाच्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2021 12:31 IST

मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनीदेखील सोशल मीडियावर गुढी उभारल्याचे फोटो शेअर करून आपल्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

गुढीपाडवा हा आनंदाचा सण... याच दिवशी हिंदू नववर्षाची सुरुवात होते. वाढत्या कोरोनाच्या संकटामुळे सर्वजण घरीच राहून गुढीपाडवा सण साजरा करत आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनीदेखील सोशल मीडियावर गुढी उभारल्याचे फोटो शेअर करून आपल्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. जाणून घेऊयात हे कलाकार कशारितीने साजरा करत आहेत गुढीपाडवा सण.

अभिनेत्री अमृता खानविलकर हिने आपल्या आईसोबत गुढीची पूजा करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती पारंपारिक वेशात दिसते आहे. तिने हा व्हिडीओ शेअर करत आपल्या चाहत्यांना घरीच रहा, सुरक्षित रहा म्हणत गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेत्री रिंकू राजगुरू शूटिंगमुळे घराबाहेर आहे. मात्र तिने साडी नेसली आहे आणि व्हिडीओ शेअर केला आहे. तिने व्हिडीओ शेअर करत लिहिले की,  सर्वांना गुढी पाडवा आणि नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने निळ्या रंगाच्या साडीत गुढीसोबतचे फोटो शेअर करत घरचा पाडवा, गुढी पाडवा म्हणत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेता संग्राम समेळचा दुसऱ्या लग्नानंतर आता पहिला पाडवा सण आहे. त्यामुळे त्याने त्याच्या पत्नीसोबत गुढी उभारून त्याची पूजा केली आहे. त्याचे फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

अभिनेत्री प्राजक्ता माळीने देखील इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत आपल्या चाहत्यांना गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने व्हिडीओ शेअर करत म्हटले की गुढी पाडव्याच्या व हिंदू नव वर्षाच्या खूप शुभेच्छा. हिंदू परंपरा, संस्कृतीचा अवलंब करा.

मृण्मयी देशपांडेने देखील आपल्या नवऱ्यासोबत गुढीची पूजा केली आणि आपल्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या.

अभिजीत खांडकेकरने सुखदा खांडकेकर सोबत फोटो शेअर करत गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिने इंस्टाग्रामवर गुढीचा फोटो शेअर करून लिहिले की, आपल्या सध्याच्या परिस्थितीत करोना कहरावर मात करून पुन्हा आधीसारखे जीवन जगण्याची प्रत्येकाची इच्छा आहे, तर आपण देखील करोनावर मात करण्यासाठी साखळी तोडून करोना नियमांचे पालन करून किंवा करोना विषाणूचा खुपलेला हा काटा काढून नविन वर्षात नविन संकल्प करून आयुष्याला सुरवात करूया. गुढीपाडवा आणि मराठी नूतन वर्षाच्या तुम्हाला व तुमच्या संपुर्ण कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा. घरी रहा सुरक्षित रहा.

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांनी पारंपारिक वेशातील फोटो शेअर करून आपल्या चाहत्यांना गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी फोटो शेअर करत म्हटले की,  पाडव्याच्या मनापासून शुभेच्छा. सगळं चांगलं होणार, सगळं व्यवस्थित होणार हे नुसतं बोलून होणार नाही. सगळं चांगलं करूया, सगळं व्यवस्थित करूया. आपण करूया. एकत्र. काळजी घ्या. सर्वांना शुभेच्छा.

या कलाकारांसोबत मराठी कलाकारांनी आपल्या चाहत्यांना कोरोनाच्या संकटात घरी राहून गुढी पाडवा सण साजरा करण्याचे आवाहन केले आहे.

टॅग्स :रिंकू राजगुरूअमृता खानविलकरसई ताम्हणकरसिद्धार्थ चांदेकरमिताली मयेकरप्राजक्ता माळीअभिजीत खांडकेकरप्रार्थना बेहरे