Join us  

गोविंदाच्या भाचीचं बोचरं दु:ख, स्पष्टच बोलली आरती सिंग, म्हणाली-'मला सांगितले जायचे...'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2023 12:35 PM

गोविंदा भाची आरती सिंगने एका मुलाखतीत केलेल वक्तव्य चर्चेत आलं आहे.

टीव्ही अभिनेता कृष्णा अभिषेकची बहीण आणि स्वत: एक टीव्ही अभिनेत्री आरती सिंग (Arti Singh)आजकाल टीव्ही स्क्रीनपासून दूर असली तरी ती नेहमीच चर्चेत असते. ती तिच्या व्हिडिओ-फोटो आणि ट्रान्सफॉर्मेशनसाठी लाइम लाइटमध्ये राहते. बिग बॉस 13 मध्येही आरती कायम चर्चेत होती. आता आरती पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दिसणार आहे. 'श्रावणी' या नवीन मालिकेत ती नकारात्मक भूमिका साकारताना दिसणार आहे. 

एका मुलाखती दरम्यान आरती सिंगने तिच्या संघर्षांबद्दल सांगितले. यादरम्यान अभिनेत्री म्हणाली- 'खर सांगू, मानसिकदृष्ट्या खूप तणाव आणि संघर्ष होता. माझ्या कुटुंबातील सर्वजण प्रसिद्ध आणि नावाजलेले होते. त्यामुळे तुम्ही कमी प्रसिद्ध असता तेव्हा त्यांची बरोबरी करणे खूप कठीण होऊन जाते.'  अभिनेत्री आरती सिंग टीव्ही स्क्रीनवर पासून दूर असली तरी कोणत्यांना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. 

फॅमिली फोटोत नव्हती जागाआरती पुढे म्हणते- 'मला अजूनही आठवते, जेव्हा मला फॅमिली फोटो क्लिक करताना बाजूला होण्यास सांगितले होते, कारण पापाराझींना फक्त स्टार्सचे फोटो काढायचे असतात. आणि जर तुमची ओळख नगण्य असेल तर तुम्हाला वेगळे व्हायला सांगितले जाते. खरे सांगायचे तर, मला तेव्हा खूप वाईट वाटायचे माझं मनं अनेकवेळा तुटलं. 

आरतीच्या म्हणण्यानुसार, ती त्यावेळची गोष्ट आहे जेव्हा तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं नव्हते. आरतीची चुलत बहिणी रागिणी खन्ना आणि सौम्या सेठ ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध नावं आहेत. दोघांनी प्रत्येकी एका हिट मालिकेत मुख्य अभिनेत्री म्हणून काम केले. आरतीने 2007 मध्ये तिच्या करिअरला सुरुवात केली. 'मायका' ही तिची पहिली मालिका होती. यानंतर त्यांनी 'गृहस्थी', 'थोडा है थोडा की जरूरत', 'उतरन' आणि 'परिचय' सारख्या मालिकांमध्ये काम केले. याशिवाय ती 'देवों के देव महादेव'मध्येही दिसली होती. 

टॅग्स :गोविंदाटिव्ही कलाकारकृष्णा अभिषेक