Join us

गोविंदाचा आदित्यच्या रिसेप्शनमधील डान्स व्हिडीओ व्हायरल, पत्नी सुनीतानेही लगावले ठुमके...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2020 14:33 IST

गोविंदाचा डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात 'यूपी बिहार लेले' गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. 

आदित्य नारायण आणि श्वेता अग्रवालच्या रिसेप्शन पार्टीमध्ये अनेक कलाकारांनी हजेरी लावली. अनेक टीव्ही कलाकारांसोबतच गोविंदाही आपल्या संपूर्ण परिवारासोबत रिसेप्शनमध्ये आला होता. खास बाब तर ही आहे की, गोविंदाने रिसेप्शनमध्ये मजबूत डान्स केला. गोविंदाचा डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात 'यूपी बिहार लेले' गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. 

आदित्य नारायणच्या या व्हिडीओत बघायला मिळत आहे की, गोविंदा, आदित्य नारायणला आपल्यासोबत घेऊन येतात. त्यानंतर त्याची पत्नी, आदित्य आणि त्याची पत्नी श्वेता एकत्र डीजेवर ठुमके लगावतात. गोविंदाचा हा व्हिडीओ त्याच्या फॅन्सकडून चांगलाच पसंत केला जात आहे. या व्हिडीओसोबत आदित्यच्या रिसेप्शनचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

आदित्य नारायण आणि श्वेत अग्रवालने १ डिसेंबरला मुंबईतील एक मंदिरात लग्न केलं. आदित्य नारायण आणि श्वेता अग्रवाल 'शापित' सिनेमात एकत्र दिसले होते आणि तेव्हापासूनच दोघेही रिलेशनशिपमध्ये आहेत. एका मुलाखतीत त्याने सांगितले होते की, तो तिला १२ वर्षांपासून ओळखतो. आदित्य इंडस्ट्रीमध्ये एक गायक म्हणून लोकप्रिय असण्यासोबतच रिअॅलिटी शो होस्टही करण्यासाठी लोकप्रिय आहे. 

टॅग्स :गोविंदाआदित्य नारायणसोशल व्हायरल