Join us

Video: खूप दिवसानंतर भेटल्या अन् काजोल-करिनाच्या भर रस्त्यात गप्पा रंगल्या...!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 17:47 IST

Kareena Kapoor and Kajol's gossip video : करिना कपूर खान आणि काजोल या दोघीही बॉलिवूडच्या तोडीस तोड अभिनेत्री. खऱ्या आयुष्यात दोघींचं नातं कसं आहे? तर याचं उत्तर तुम्हाला या व्हिडीओत मिळेल.

 Kareena Kapoor and Kajol's gossip video : करिना कपूर खान ( Kareena Kapoor) आणि काजोल (Kajol ) या दोघीही बॉलिवूडच्या तोडीस तोड अभिनेत्री. खऱ्या आयुष्यात दोघींचं नातं कसं आहे? तर याचं उत्तर तुम्हाला या व्हिडीओत मिळेल. होय, काजोल आणि करिनाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. जुनी दोन जुन्या मैत्रिणी अनेक वर्षानंतर भेटाव्या तशा दोघीही भेटल्या. मग काय, रस्त्यावरच दोघींच्या गप्पा सुरू झाल्या. अगदी कुणाचीही पर्वा न करता दोघीही नुसत्या बोलत सुटल्या. किती बोलू नि किती नको असं दोघींना झालं.

करिना व काजोलचा हा व्हिडीओ मेहबूब स्टुडिओ बाहेरचा आहे. योगायोगाने दोघीही एकाचवेळी तिथ पोहोचल्या. दोघीही आपआपल्या कारमधून उतरल्या अन् मग रस्त्यावरच दोघींच्या गप्पा रंगल्या.

क्या चल रहा है? इथून सुरूवात झाली. मग तुझं बाळ कसं आहे, कोरोनाचा अनुभव कसा होता, अजय कसा आहे, सैफ कसा आहे, अशा गप्पा सुरू झाल्यात. तुझा छोटा मुलगा कसा आहे? असं काजोल करिनाला विचारते. त्यावर .एका वर्षात बरंच काही झालं आहे. आम्हाला करोना झाला होता..., असं म्हणते. दोघींच्या गप्पा अशा रंगात आल्या असताना  रस्त्यावर गर्दी होते. नंतर दोघीही आपापल्या गाडीमध्ये जाऊन बसतात. त्याआधी एकमेकांना मिठी मारतात.

करिना व काजोलचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यावर चाहते एकापेक्षा एक भारी कमेंट्स देत आहेत.‘नॉर्मल लोग है ये भी भाई,’ अशी मजेशीर कमेंट एका चाहतयने केली आहे. एकाने याला ‘कभी खुशी कभी गम रियुनियन’ म्हटलं आहे. आओ बहन चुगली करे, अशी धम्माल प्रतिकिया एका युजरने दिली आहे. काजोल व करिना या दोघींनी ‘कभी खुशी कभी गम’ शिवाय ‘वी आर फॅमिली’ या सिनेमात एकत्र काम केलं आहे. काही महिन्यांपूर्वी करिनाच्या रेडिओ शोमध्ये काजोल गेस्ट बनून आली होती.

टॅग्स :काजोलकरिना कपूरबॉलिवूड