Join us
Daily Top 2Weekly Top 5

दिलीप कुमार यांनी दुसरं लग्न का केलं?; निधनानंतर Google वर होतंय सर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2021 14:35 IST

30 मे, 1980 मध्ये बंगलौर मध्ये पाकिस्तानच्या आसमा रेहमानशी दिलीप कुमार यांनी दुसरे लग्न केले. दिलीप कुमार यांच्या दुस-या लग्नामुळे प्रचंड चर्चा लागल्या.

दिवंगत ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार आणि सायरा बानो यांची जोडी बॉलिवूडमधील सर्वात जुन्या जोड्यांपैकी आदर्श जोडी मानली जाते. सायरा बानो यांनी 1966मध्ये वयाच्या 22व्या वर्षी दिलीप कुमार यांच्याशी लग्न केलं होतं. ज्यावेळी लग्न झालं त्यावेळी दिलीप कुमार 44 वर्षांचे होते. दोघांमध्ये असलेल्या वयातील अंतरामुळे लग्न करावे की नाही या कारणामुळे दिलीप कुमारही संभ्रमात होते. पण सायराने निश्चयच केला होता की लग्न करेन तर दिलीप कुमार यांच्याशीच त्यामुळे दिलीप कुमार यांनीही लग्नासाठी होकार दिला आणि  1966 मध्ये दोघांनी लग्न केलं.   

सायरा बानो आणि दिलीप कुमार यांना कधीही मुल झालं नाही. याबाबत दिलीप कुमार यांनी आपली ऑटोबायोग्राफी 'द सबस्टांस अॅन्ड द शॅडो' यामध्ये लिहीलं आहे. 1972मध्ये ज्यावेळी सायरा गरोदर होत्या. त्यावेळी 8व्या महिन्यामध्ये सायरा यांना ब्लडप्रेशरचा त्रास होऊ लागला. त्यावेळी बाळाला वाचवण्यासाठी सर्जरी करणं शक्य नव्हतं. अशा क्रिटीकल परिस्थितीमध्ये गुदमरून बाळाचा पोटातच मृत्यू झाला. त्यानंतर सायरा कधीही आई होऊ शकल्या नाही.

लग्नानंतर या कपलच्या आयुष्यात असा एक क्षण आला की, दिलिप कुमार यांनी सायरा बानोसोबत लग्न करुनही दुसरे लग्न केले. 30 मे, 1980 मध्ये बंगलौर मध्ये पाकिस्तानच्या आसमा रेहमानशी दिलीप कुमार यांनी दुसरे लग्न केले. दिलीप कुमार यांच्या दुस-या लग्नामुळे प्रचंड चर्चा लागल्या. सायरा आई होऊ शकत नाही म्हणून दिलीप यांनी दुसरं लग्न केलं. यांमुळे सायरा पुरत्या खचल्या होत्या. 

 

पिता बनता यावे म्हणून आसमासोबत दुसरं लग्न केलं पण हे लग्न फार काळ टिकू शकलं नाही. विशेष म्हणजे आसमा विवाहीत असून तीन मुलांची आई होती. 1983 मध्ये असमा आणि दिलीप कुमार यांच्यामध्ये घटस्फोट झाला. आसमा आपल्याला धोका देत असल्याचे लक्षात येताच तिला सोडून दिलीप कुमार पुन्हा सायराकडे परतले.

सायराचे दिलीप कुमार यांच्यावर प्रचंड प्रेम होते. या प्रेमापोटीच त्यांनी दिलीप कुमार यांना माफ करत स्विकारले. दोघंही गुण्यागोविंदाने एकत्र राहू लागले. दोघ बाहरेही एकत्रच जायचे. आजारपणातही सायरा यांनी दिलीप कुमार यांची उत्तम काळजी घेतली.

टॅग्स :दिलीप कुमारसायरा बानू