Join us

करीना कपूरच्या चाहत्यांसाठी खुशखबर!, बेबो लवकरच दिसणार या शोमध्ये; टीझर केला शेअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2021 21:58 IST

करीना कपूर खानने इंस्टाग्रामवर आगामी प्रोजेक्टचा टीझर शेअर केला आहे.

बॉलिवूडची बेबो म्हणजेच अभिनेत्री करीना कपूर खान बॉलिवूडमधील बिझी अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने पहिल्या प्रेग्नेंसीसारखेच दुसऱ्या प्रेग्नेंसीमध्ये आपल्या कामासोबत कोणतीच तडजोड केली नाही. प्रेग्नेंट असताना तिने आमिर खानसोबत लाल सिंग चड्ढा चित्रपटाचे शूटिंग केले. दुसऱ्यांदा आई झाल्यानंतर तिने शॉर्ट टर्म मॅटर्निटी लिव घेतली आणि आता ती कामावर परतली आहे. बेबो छोट्या- मोठ्या जाहिरांतीचे शूटिंग करत आहे. आता ती एका नवीन कुकिंग शोमध्ये दिसणार आहे. याचा टीझर तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

करीना कपूर खानने इंस्टाग्रामवर तिचा नवीन कुकिंग शो स्टार व्हर्सेस फूडचा टीझर शेअर केला आहे. यात ती कुकिंग करताना दिसते आहे. तिच्यासोबत शोमध्ये मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर दिसत आहेत. तिने टीझर शेअर करत लिहिले की, प्रत्येक जो व्यक्ती ज्याला कपूर कुटुंबाबद्दल माहित आहे त्यांना माहित आहे की आम्हाला पदार्थांची किती आवड आहे. मी स्टार व्हर्सेस फूडच्या माध्यमातून शोची झलक दाखवण्यासाठी खूप उत्साही आहे. हा तोंडाला पाणी येणारा पिज्जा बनवून सर्वात आधी बाइट घेण्यासाठी खूप उत्साही होते. शेअर सरिता परेरा धीर ठेवण्यासाठी तुमची आभारी आहे. तुम्ही दमदार होतात. १५ एप्रिलला डिस्कव्हरी प्लस पाहायला विसरू नका.मी देखील पाहण्यासाठी उत्सुक आहे की अर्जुन कपूर, मलायका अरोरा आणि करण जौहरने काय शिजविले.

व्हिडीओत दाखवले गेले आहे की करीना, मलायका, करण जौहर, अर्जुन आणि प्रतीक गांधी कुकच्या मदतीने काहीतरी स्वादिष्ट पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. व्हिडीओ पाहून असे वाटत आहे की ज्या पद्धतीने स्टार्स पदार्थ बनवणे एन्जॉय करत आहेत तसेच प्रेक्षकदेखील कलाकारांना पदार्थ बनवताना पाहणे एन्जॉय करतील. वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर आमिर खानसोबतचा करीना कपूरचा चित्रपट लाल सिंग चड्ढाच्या रिलीजचा चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. 

टॅग्स :करिना कपूरमलायका अरोराअर्जुन कपूरकरण जोहर