Join us
Daily Top 2Weekly Top 5

खुशखबर! थिएटरनंतर आता OTTवर दाखल होतोय 'धुरंधर', जाणून घ्या कुठे आणि कधी पाहता येणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 15:09 IST

Dhurandhar Movie OTT Released Date: रणवीर सिंगचा नुकताच प्रदर्शित झालेला 'धुरंधर' चित्रपट बॉक्स ऑफिसवर अक्षरशः कहर माजवत आहे. त्याचवेळी, प्रेक्षक या चित्रपटाच्या ओटीटी (OTT) रिलीजची तारीख जाणून घेण्यासाठी देखील खूप उत्सुक आहेत.

'धुरंधर' प्रदर्शनाच्या दिवसापासूनच दमदार कामगिरी करत आहे आणि छप्परफाड कमाईसह नवनवीन विक्रम आपल्या नावावर करत आहे. उत्कृष्ट अभिनयापासून ते थरारक ॲक्शन आणि ट्विस्टपर्यंत, प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी चित्रपटात सर्व काही आहे आणि याच कारणामुळे आदित्य धर दिग्दर्शित हा स्पाय ॲक्शन चित्रपट रिलीज झाल्यापासून चर्चेत आहे. दुसऱ्या आठवड्यात भारतात ४०० कोटी आणि जगभरात ५०० कोटी रुपयांहून अधिक कमाई करून हा चित्रपट 'हाऊसफुल' आहे. दरम्यान, आता या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजचे तपशीलही समोर आले आहेत. थिएटरमधील प्रदर्शनानंतर हा चित्रपट कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आणि कधी दाखल होणार? हे जाणून घेऊयात.

ज्यांना घरी बसून 'धुरंधर' पाहायचा आहे, त्यांच्यासाठी ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सने (Netflix) चित्रपट निर्मात्यांसोबत मोठी रक्कम देऊन सिनेमाच्या राइट्सची डील केली आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी म्हणजेच जानेवारी २०२६ मध्ये प्रदर्शित होईल. 'जीक्यू इंडिया'च्या वृत्तानुसार, तीन तासांहून अधिक कालावधीचा 'धुरंधर' ३० जानेवारीपासून नेटफ्लिक्सवर प्रसारीत होऊ शकतो. मात्र, निर्माते किंवा प्लॅटफॉर्मने याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

ठरली सर्वात महागडी डीलमिळालेल्या माहितीनुसार, ओटीटी प्लॅटफॉर्मने १३० कोटी रुपयांमध्ये चित्रपटाचे डिजिटल अधिकार खरेदी केले आहेत, ज्यामुळे ही रणवीर सिंगच्या चित्रपटाची आतापर्यंतची सर्वात महागडी डील ठरली आहे. स्ट्रीमिंगद्वारे प्रेक्षक हा चित्रपट हाय-डेफिनिशन क्वालिटीमध्ये पाहू शकतील, ज्यामध्ये सर्व ॲक्शन सीक्वन्स आणि कथेतील ट्विस्ट पूर्ण स्पष्टतेसह सादर केले जातील.

बॉक्स ऑफिस कलेक्शनया सगळ्यात 'धुरंधर'च्या बॉक्स ऑफिस कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर, हा चित्रपट तुफान कमाई करत आहे आणि दररोज मोठ्या चित्रपटांना मागे टाकून नवीन विक्रम प्रस्थापित करत आहे. 'धुरंधर'ने २८ कोटींच्या कलेक्शनसह ओपनिंग केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी १४.२९ टक्क्यांच्या वाढीसह ३२ कोटी आणि तिसऱ्या दिवशी ३४.३८ टक्क्यांची उसळी घेत ४३ कोटींची कमाई केली. चौथ्या दिवशी ४५.९३ टक्क्यांच्या घसरणीनंतर २३.२५ कोटींचे कलेक्शन झाले. यानंतर पाचव्या दिवशी २७ कोटी, सहाव्या दिवशी २७ कोटी आणि सातव्या दिवशीही २७ कोटींचा व्यवसाय केला. यासोबतच 'धुरंधर'ची पहिल्या आठवड्याची एकूण कमाई २०७.२५ कोटी रुपये झाली. विशेष बाब म्हणजे, या चित्रपटाने रिलीजच्या दुसऱ्या आठवड्यात पहिल्या आठवड्यापेक्षाही जास्त कमाई केली आहे. 'धुरंधर'ने आठव्या दिवशी ३२.५ कोटी, नवव्या दिवशी ५३ कोटी आणि दहाव्या दिवशी सर्वाधिक ५८ कोटींचे कलेक्शन करून इतिहास रचला.

त्यानंतर 'धुरंधर'ने 'हाएस्ट ग्रॉसिंग सेकंड मंडे'चा विक्रम आपल्या नावावर केला आणि ३०.५ कोटींचे कलेक्शन केले. दुसऱ्या मंगळवारीही याचे कलेक्शन ३० कोटी रुपये राहिले. याचसोबत 'धुरंधर'ची भारतातील १२ दिवसांची एकूण कमाई आता ४११.२५ कोटी रुपये झाली आहे. हा चित्रपट तिसऱ्या विकेंडपर्यंत ५०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करू शकतो. सध्या सर्वांच्या नजरा बॉक्स ऑफिसवर खिळल्या आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Blockbuster 'Dhurandhar' Coming to Netflix in 2026 After Theatrical Run

Web Summary : Box office hit 'Dhurandhar,' earning crores, will stream on Netflix in January 2026. Netflix acquired digital rights for ₹130 crore. The film has grossed over ₹411.25 crore in India within 12 days, setting box office records.
टॅग्स :धुरंधर सिनेमारणवीर सिंग