Join us

"प्रेक्षकांना चांगल्या कामगिरीची..." 'छावा' पाहिल्यावर जिनिलिया देशमुख म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 12:32 IST

'छावा'मधील विकी कौशलचा अभिनय पाहून भारावून गेली जिनिलिया देशमुख, म्हणाली...

Genelia Deshmukh reaction on Chhaava Movieछ विकी कौशलचा (vicky kaushal) 'छावा' (Chhaava) सिनेमा चर्चेत आहे. या सिनेमामध्ये  छत्रपती संभाजी महाराजांच्या शूर पराक्रमाची गाथा मांडण्यात आली आहे. विकी कौशल हा छत्रपती संभाजी महाराजांच्या भुमिकेत इतिहास जिवंत करताना दिसतोय. विकी कौशलने अतिशय बारकाईने ही भूमिका साकारली आहे.  'छावा' पाहण्यासाठी थिएटरमध्ये प्रेक्षकांची हाऊसफुल्ल गर्दी पाहायला मिळतेय. प्रेक्षकच नाही तर सेलिब्रिटीही या सिनेमाचं कौतुक करत, त्याबद्दल पोस्ट शेअर करत आहेत. अशातच आता महाराष्ट्राची लाडकी वहिणी जिनिलिया देशमुखनेदेखील (Genelia Deshmukh) विकीच्या अभिनयावर प्रतिक्रिया दिली आहे. 

जिनिलियानं नुकताच 'छावा' सिनेमा पाहिला असून विकीच्या अभिनयानं तिला थक्क केलं. इन्स्टाग्राम स्टोरीवर विकीचं कौतुक करणारी पोस्ट शेअर केली आहे.  तिनं इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिलं, प्रेक्षकांसाठी असे काही स्टार असतात, ज्यांच्याकडून प्रेक्षकांना नेहमीच चांगल्या कामगिरीची अपेक्षा असते. विकी कौशल हा माझ्यासाठी त्यापैकी एक आहे. पडद्यावर अद्भुत दिसण्याव्यतिरिक्त त्याची प्रामाणिकता आणि कठोर परिश्रम तुम्हाला भुरळ घालतात", या शब्दात तिनं विकीचं कौतुक केलं. निकीसह जिनिलियानं दिग्दर्शक लक्ष्मण उतकरे, रश्मिका मंदाना आणि छावाच्या संपुर्ण टीमचं अभिनंदन केलं.

किती कोटी कमावले?

'छावा' सिनेमा थिएटरमध्ये हाउसफुल्ल गर्दीत सुरु आहे.  प्रेक्षकांच्या तोंडी फक्त छावाचं आहे. आजही हा चित्रपट पाहण्यासाठी सर्व थिएटर (Chhaava Box Office Collection) हे हाऊसफूल असल्याचं दिसून येत आहे.  'छावा'नं रिलीजच्या पहिल्याच दिवशी (शुक्रवार) ३३.१ कोटींपेक्षा जास्त कमाई केल्यानं तो विकीच्या सोलो हिरो म्हणून कारकिर्दीतील आतापर्यंतचा सर्वात मोठी ओपनिंग सिनेमा ठरला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी (शनिवार) सिनेमाने ३९.३ कोटींची कमाई केली. तर तिसरा दिवस रविवारी ४९.३ कोटींचा गल्ला सिनेमाने जमावला. चौथा दिवस सोमवारी २४.१ आणि पाचवा दिवस मंगळवारी २५.७५ कोटी कमावले. तर काल सहाव्या दिवशी म्हणजे  शिवजयंतीला (Shiv Jayanti 2025) चित्रपटाने तब्बल ३२ कोटी रुपयांचे कलेक्शन केलं आहे.  या चित्रपटाचे सहा दिवसांचे भारतातील कलेक्शन २०३.२८ कोटींपेक्षा अधिक झालं आहे. १३० कोटी रुपयांमध्ये बनवण्यात आलेल्या सिनेमानं आपलं बजेट तर कधीच वसूल केलं आहे. आता लवकरच तो ३०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करू शकतो.  

टॅग्स :जेनेलिया डिसूजाविकी कौशलसंभाजी राजे छत्रपती