Join us
Daily Top 2Weekly Top 5

"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 16:59 IST

अनेक डान्स रिएलिटी शोमध्ये गीता माँने परिक्षकाची भूमिका निभावली आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत गीताने रिएलिटी शोच्या रिएलिटीवर भाष्य केलं. 

गीता माँ अशी ओळख मिळवलेली डान्सर आणि कोरिओग्राफर गीता कपूर हे बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीमधील मोठं नाव आहे. गीता कपूरने अनेक बॉलिवूड गाण्यांना कोरिओग्राफ केलं आहे. तर अनेक डान्स रिएलिटी शोमध्ये गीता माँने परिक्षकाची भूमिका निभावली आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत गीताने रिएलिटी शोच्या रिएलिटीवर भाष्य केलं. 

हर्ष लिंबाचिया आणि भारती सिंगच्या पॉडकास्टमध्ये गीता माँने हजेरी लावली होती. या पॉडकास्टमध्ये तिने डान्स रिएलिटी शोच्या रिएलिटीवर प्रश्नचिन्ह उभं करणाऱ्यांना स्पष्ट शब्दांत उत्तर दिलं. ती म्हणाली, "तुम्ही जबरदस्ती रडू शकत नाही. ते खरोखरंच असतं. आम्ही अॅक्टर नाही. जर आम्ही अॅक्टर असतो तर काहीतरी वेगळं काम करत असतो. रिएलिटी शो किती रियल आहेत?, असा प्रश्न अनेक जण विचारतात. पण, ते लोक जेव्हा गेस्ट म्हणून शो बघायला येतात. तेव्हा ते रडतात. तेव्हा ते लोक बोलतात की आम्हाला वाटलेलं हे सगळं स्क्रिप्टेड असतं. काही गोष्टी नक्कीच स्क्रिप्टेड असतात. आपण तर १२ तास काम करतो आणि त्यात ब्रेकही मिळतो. पण, बिग बॉसमध्ये २४ तास तुमच्यावर कॅमेऱ्याची नजर असते. मग तुम्ही किती अभिनय कराल?".  

त्यावर हर्ष लिंबाचिया म्हणतो की "जेव्हा एखादा स्पर्धक डान्स करायला समोर येतो. तेव्हा त्याची कहाणी दाखवल्यानंतर त्यामागची त्याची मेहनत लक्षात येते". त्यानंतर गीता माँ म्हणते, "तू एक लेखक आहेस, म्हणून तुला या गोष्टी समजतात. स्क्रिप्ट लिहिणाऱ्या एका लेखकालाच ही गोष्ट समजू शकते. मला वाटतं की हे श्रेय लेखकांना दिलं गेलं पाहिजे. त्यांच्या क्रिएटिव्हिटीला श्रेय मिळालं पाहिजे. कारण, आपण कितीही म्हटलं की फक्त डान्सच दाखवायचं तरी लोकांना कथाच ऐकायच्या असतात. कोणाच्या तरी आयुष्यात डोकावून बघायला आपल्याला पण आवडतंच. नाहीतर बिग बॉस कसं चाललं असतं?".

टॅग्स :गीता कपूरटिव्ही कलाकार