Join us
Daily Top 2Weekly Top 5

"...तर मी नवऱ्याला सोडेन", सबसे कातिल गौतमी पाटील ‘त्या’ प्रश्नावर स्पष्टच बोलली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2023 18:24 IST

सोशल मीडिया स्टार आणि लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील ही अल्पावधीत महाराष्ट्रात लोकप्रिय झाली. चाहत्यांना गौतमीच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्याची खूप उत्सुकता असते.

सोशल मीडिया स्टार आणि डान्सर गौतमी पाटील (Gautami Patil) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. दिवसेंदिवस गौतमीच्या चाहत्यांच्या संख्येत वाढ होताना दिसते आहे. तसेच गौतमीच्या डान्सचे व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. अनेक कार्यक्रमानिमित्त तिचे डान्स शो आयोजित केले जातात. तिच्या कार्यक्रमाला हजारो चाहते गर्दी करत असतात.  तिच्या चाहत्यांना तिच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्याची खूप उत्सुकता असते. 

वडील लहानपणी सोडून गेल्यानंतर गौतमीला तिच्या आईनेच मोठं केलं. आई आजारी पडली, त्यामुळे पैशांसाठी   गौतमीने शाळा सोडली आणि डान्स करायला सुरुवात केली.  युट्युबर @theoddengineer या चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत गौतमी पाटील म्हणाली, मी आईसाठी काम करते. मी लग्न करुन जाईन, तर तिचं काय होईल, ती कुठे जाईल, तिला कोण सांभाळणार असे विचार येतात. खरं तर मीच तिला एकटीला सोडून कुठे जाणार नाही. अगदीच जर अशी वेळ आली तर मी नवऱ्याला सोडून देईन.

दरम्यान  युट्युबर @theoddengineer या चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत याआधी ही गौतमीने आपल्या होणाऱ्या नवऱ्याबाबतच्या अपेक्षा सांगितल्या होत्या. ती म्हणते की, मला पैसे, बंगला, प्रतिष्ठा कशाची गरज नाही पण येईल त्या परिस्थितीत माझी साथ देणारा माझा जोडीदार हवा आहे. त्यामुळे असा मुलगा जेव्हा मिळेल तेव्हा मी लग्नाचा विचार करेन.  गौतमी पाटील लवकरच घुंघरु या चित्रपटात काम करताना दिसणार आहे.

 

टॅग्स :गौतमी पाटील