Join us

'माझा होशील ना' नाही तर या मालिकेतून गौतमी देशपांडेने केलं होतं अभिनयात पदार्पण, नाव वाचून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 17:22 IST

अभिनेत्री गौतमी देशपांडे(Gautami Deshpande) हिने कमी वेळात छोट्या पडद्यावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

अभिनेत्री गौतमी देशपांडे(Gautami Deshpande) हिने कमी वेळात छोट्या पडद्यावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज गौतमी 30वा वाढदिवस साजरा करतेय. गौतमी ही अभिनेत्री मृण्मयी देशपांडे (Mrunmayee Deshpande) हिची धाकटी बहीण आहे. बहिणीच्या पावल्यावर पाऊल टाकत तिनेही अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.

अभिनेत्री असण्यासोबतचं ती एक उत्तम गायिका देखील आहे. अनेक वेळा ती गाण्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. गौतमीला गाण्याचा वारसा तिच्या आजीकडून मिळाला आहे. सोशल मीडियावर देखील गौतमीचं मोठं फॅन फॉलोविंग आहे.. तिच्या प्रत्येक पोस्टची चर्चा पाहायला मिळते.

गौतमीने झी मराठीवरील माझा होशील ना या मालिकेत सईची भूमिका साकारली होती. विराजस कुलकर्णी या तिच्या लहानपणीच्या मित्रासोबतच पडद्यावर नायिका साकारण्याची संधी मिळाल्याने या दोघांची केमिस्ट्री चांगलीच जुळून आली आहे.

मालिकेचं दुसरं पर्व येणार असल्याचीही चर्चा सध्या सोशल मीडियात सुरू आहे.पण तुम्हाला माहिती आहे का, गौतमीने सोनीवरील सारे तुझ्याचसाठी मालिकेतून अभिनयात पदार्पण केलं होतं.  या मालिकेत तिची जोडी हर्षद आतकरीसोबत जमली होती. या मालिकेतील गौतमीच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते.  

टॅग्स :गौतमी देशपांडेमृण्मयी देशपांडे