Join us  

सुनिल ग्रोवर - शिल्पा शिंदेच्या वादावर शोच्या निर्मात्यांनी दिले स्पष्टीकरण, शिल्पाला शोमध्ये आणण्यासाठी प्रयत्न सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2020 2:55 PM

सुनील ग्रोव्हरसोबत काम करण्याची इच्छा नसल्याचे तिने म्हटले आहे. सुनिल ग्रोवर नसेल तरच मी या शोमध्ये काम करणार असल्याची अटच तिने निर्मात्यांसमोर ठेवली आहे.

अभिनेत्री शिल्पा शिंदे ही बिग बॉसची विजेती झाल्यानंतर टीव्ही इंडस्ट्रीपासून लांबच गेली होती.‘भाभीजी घर पर हैं’ हा शो देखील काही कारणामुळे मध्येच सोडला होता. बिग बॉसनंतर तब्बल २ वर्षानंतर सुनिल ग्रोवरसह ‘गँग्स ऑफ फिल्मीस्तान’ या कॉमेडी शोच्या माध्यमातून रसिकांच्या भेटीला येणार होती. शिल्पा शिंदे पुन्हा छोट्या पडद्यावर अवतरणार म्हटल्यावर चाहतेही उत्सुक होते. मात्र सुनिल ग्रोवर आणि तिच्यात वाद झाला तसेच  निर्मात्यांच्या कामामुळे खुश नसल्याचे सांगत तिने हा शो सुरू होण्याआधीच सोडला. 

सुनील ग्रोव्हरसोबत काम करण्याची इच्छा नसल्याचे तिने म्हटले आहे. सुनिल ग्रोवर नसेल तरच मी या शोमध्ये काम करणार असल्याची अटच तिने निर्मात्यांसमोर ठेवली आहे. निर्मात्यांनी मला खोटे सांगितले, सुनील ग्रोव्हर या शोमध्ये नसेल. मात्र, मला समजले की, ग्रोव्हर या शोचा भाग असणार आहेत. मी निर्मात्यांना विचारले तर त्यांनी मला संपूर्ण कास्टबद्दल सांगितले असेही तिने सांगितले. 

शिल्पा शिंदे आणि निर्मांत्यासह झालेला वाद वाढु नये म्हणून निर्मात्यांनीच पुढाकार घेत या बाबत स्पष्टीकरण दिले आहे. स्क्रिप्ट्स आणि स्टोरी लाईन्स शोच्या फायद्यासाठी सुधारणेच्या दृष्टीने बदलतात. जरी अलिकडच्या घटनेत शिल्पाने सुनील ग्रोव्हरबरोबर काम करण्याची इच्छा नसल्याबद्दल आपली नाराजी व्यक्त केल्याचे समोर आले आहे. हा गोंधळ आमच्या या क्रिएटिव्ह कॉलमुळे झाला असल्याचे आम्ही गृहित धरू शकतो, परंतु आम्ही आपल्याला खात्री देतो की आम्ही हा गैरसमज शांतपणे सोडवण्याचा प्रयत्न करीत आहोत जेणेकरुन आम्ही तिला शोमध्ये परत आणू''. त्यामुळे आता निर्माते शिल्पा शिंदेची समजूत काढत असून तिने शोमध्ये काम करावे यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आता शिल्पा शिंदे या शोमध्ये काम करणार की दिलेल्या अटीवरच ठाम राहणार हेही लवकरच स्पष्ट होईल.

टॅग्स :शिल्पा शिंदेसुनील ग्रोव्हर