Join us
Daily Top 2Weekly Top 5

गजेंद्र अहिरे व सचिन पिळगावकर पहिल्यांदाच दिसणार एकत्र ह्या सिनेमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2018 20:30 IST

मराठी सिनेसृष्टीला अनेक आशयघन सिनेमे देणारे दिग्दर्शक गजेंद्र अहिरे 'सोहळा' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत.

ठळक मुद्दे'सोहळा'ची कथा आजच्या विभक्त कुटुंबाच्या पार्श्वभूमीवर आधारीत

मराठी सिनेसृष्टीला अनेक आशयघन सिनेमे देणारे दिग्दर्शक गजेंद्र अहिरे 'सोहळा' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. नातेसंबंधातील झालेल्या बदलाचे चित्रण या सिनेमात करण्यात आले आहे. 

'सोहळा' चित्रपटाची कथा आजच्या विभक्त कुटुंबाच्या पार्श्वभूमीवर आधारीत आहे. विभक्त कुटुंब, नाते संबधांवर आधारीत अनेक सिनेमे प्रदर्शित झाले. मात्र या सिनेमाची कथा काहीशी हटके आहे. शिल्पा तुळसकर व सचिन पिळगांवकर नवरा बायकोच्या भूमिकेत असून त्या दोघांतील मतभेदामुळे आयुष्य कसे उद्धवस्त होते, हे दाखवण्यात आले आहे. 

'सोहळा' चित्रपटाच्या निमित्ताने गजेंद्र अहिरे व सचिन पिळगावकर हे दोघे पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. अरिहंत प्रॉडक्शन या बॅनरखाली सिनेमाची निर्मिती करण्यात आली असून सोहन बोकाडिया व सुरेश गुंडेचा हे निर्माते आहेत. तर के.सी बोकाडिया यांनी सिनेमाची प्रस्तुती केली आहे. या सिनेमात एकूण चार गाणी असून नरेंद्र भिडे यांचे संगीत सिनेमाला लाभले आहे. 'पांस्थथ मी', 'तुझ्या माझ्या आभाळाला', 'नो प्रॉब्लेम' या गाण्यांचा आस्वाद आपल्याला या सिनेमात घेता येणार आहे. पं. रघुनंदन पणशीकर, सचिन पिळगावकर, अवधूत गुप्ते, प्रविण कुंवर, निहिरा जोशी, अभय जोधपूरकर या गायकांनी सिनेमातील गाणी गायली आहेत. विक्रम गोखले, मोहन जोशी, लोकेश गुप्ते, आस्मा खामकर यांच्याही प्रमुख भूमिका सिनेमात पाहायला मिळणार आहे. कलाकारांचा 'सोहळा' रुपेरी पडद्यावर पाहणे कमालीचे ठरणार आहे. 

टॅग्स :सचिन पिळगांवकरगजेंद्र अहिरे