Join us
Daily Top 2Weekly Top 5

जेव्हा 'गदर 2' दिग्दर्शकाने नसीरुद्दीन शाहांना बिकीनी घालायला लावली, सांगितला 'तो' किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2023 16:13 IST

नसीरुद्दीन शाहांना बिकीनी घालण्यास कसं तयार केलं

'गदर' फेम निर्माते अनिल शर्मा (Anil Sharma) सध्या सिनेमाचं यश एन्जॉय करत आहेत. तर नुकतंच त्यांनी आपल्या 1992 साली रिलीज झालेल्या 'तहलका' सिनेमाविषयी एक इंटरेस्टिंग किस्सा सांगितला. सिनेमातील एका सीनमध्ये नसीरुद्दीन शाह, जावेद जाफरी आणि आदित्य पांचोली यांनी बिकीनी घातली होती. हे पाहून प्रेक्षकांना आश्चर्य वाटलं होतं. आता या सीनबद्दल अनिल शर्मा यांनी गंमतीशीर किस्सा सांगितला आहे.

दिग्गज अभिनेते नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) बिकीना घालण्यासाठी कसे तयार झाले यावर अनिल शर्मा म्हणाले, 'नसीरुद्दीन शाह यांना बिकीनीत पाहून प्रेक्षक आश्चर्यचकीत झाले होते. लोक मला विचारायचे की नसीरुद्दीन शाह यांना कसं तयार केलं. तर नसीरुद्दीन शाह मला म्हणाले होते की फाटलेला कुर्ता घालायला देता तेव्हा मी काहीच प्रश्न उपस्थित करत नाही. आता मला बिकीना घालायला लावत आहात तर मी काय प्रश्न विचारु. दिग्दर्शक जे सांगत आहे ते मी करत आहे. खऱ्या आयुष्यात थोडीच मी हे करत आहे. भूमिकेची गरज पाहता नसीरुद्दीन यांनी कोणतेही प्रश्न न विचारता बिकीनी घातली.'

काही दिवसांपूर्वी नसीरुद्दीन शाह यांनी 'गदर 2'वर टीका केली होती. हा सिनेमा कसा हिट होऊ शकतो मी तर पाहूच शकलो नाही असं ते म्हणाले होते. तर अनिल शर्मा यांनी त्यांना एकदा सिनेमा पाहण्याची विनंती केली होती. 

टॅग्स :नसिरुद्दीन शाहसिनेमा