Join us

Gadad Andhar Marathi Movie : ‘गडद अंधार’ला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, जय दुधाणेही भारावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2023 15:09 IST

Gadad Andhar Marathi Movie : ‘गडद अंधार’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. लोकांचा हा प्रतिसाद पाहून अभिनेता जय दुधाणे सुद्धा भारावला आहे. त्याने एक पोस्ट शेअर करत, मायबाप प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.

Gadad Andhar Marathi Movie : मराठीत चित्रपटसृष्टीत सध्या वेगवेगळे प्रयोग होत आहेत. ‘गडद अंधार’ हा असाच एक वेगळ्या धाटणीचा, वेगळ्या वाटेवरचा सिनेमा. एका थरारक कथेसोबत पाण्याखालचं विश्व दाखवणाऱ्या या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली होती. गत ३ फेब्रुवारीला हा सिनेमा रिलीज झाला. सध्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. लोकांचा हा प्रतिसाद पाहून अभिनेता जय दुधाणे (Jay Dudhane) सुद्धा भारावला आहे. त्याने एक पोस्ट शेअर करत, मायबाप प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.

‘गडद अंधार’ या चित्रपटात जय मुख्य भूमिकेत आहे. नुकतीचं त्याने एक पोस्ट शेअर केली आहे. यात प्रेक्षकांच्या गराड्यातील काही फोटो शेअर केले आहेत. बॉक्स ऑफिसवरच्या पहिल्या आठवड्यात इतकं प्रेम दिल्याबद्दल तुमचे आभार, असं कॅप्शन त्याने या पोस्टला दिलं आहे. ‘गडद अंधार’ हा पाण्याखाली, समुद्राखाली शूट झालेला हा पहिला सिनेमा आहे. जय दुधाणेचा सुद्धा हा पहिला सिनेमा आहे. या चित्रपटाद्वारे त्याने डेब्यू केला आहे. 

या सिनेमाबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती. ११० फूट खोल समुद्राखाली शूट होणारा हा पहिला भारतीय सिनेमा आहे. चार मित्रांची कथा या सिनेमात दाखवण्यात आली आहे. जय दुधाणे, नेहा महाजन, शुभांगी तांबळे, आकाश कुंभार हे मुख्य भूमिकेत आहेत. सगळे एका ट्रिपवर जातात. स्कूबा डायव्हिंग करायला गेल्यावर सुरू होतो एक थरार. कथा कोकणातील आहे. सिनेमाची अनोखी कथा, त्यातला थरार पाहतांना आपण गुंतून जातो. हा सुपर नॅचरल, हॉरर सिनेमा अंगावर काटा आणतो. 

टॅग्स :नेहा महाजनमराठी चित्रपटमराठी अभिनेता