आज प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला अर्थात २५ जानेवारीला पद्म पुरस्कारांची घोषणा झाली आहे. यावेळी महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे महाराष्ट्रातील लोकनाट्य तमाशा कलाकार रघुवीर खेडकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. रघुवीर हे गेल्या अनेक वर्षांपासून लोकनाट्य कलाकार म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे पद्मश्री पुरस्काराने मिळणारा हा सन्मान त्यांच्या कार्याला मिळालेली पोचपावती आहे.लोकनाट्य तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांची गेल्या अनेक वर्षांपासून लोककलावंत म्हणून महाराष्ट्रात ओळख आहे. लोकनाट्यात तमाशा, सरदार, शाहीर अशा विविध भूमिका त्यांनी साकारल्या. त्यांनी आपल्या नाटकांमधून फक्त मनोरंजन केलं नाही तर समाजप्रबोधन केलं आहे. याशिवाय सध्या तमाशा कलावंतांची बाजू मांडणाऱ्या संघटनांमध्ये रघुवीर खेडकर कार्यकर्ते म्हणून सक्रीय आहेत.कोणाकोणाला पद्म पुरस्कार जाहीर?तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांच्यासह महाराष्ट्रातीलच अर्मिडा फर्नांडीस यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. परभणीचे प्रयोगशील शेतकरी श्रीरंग लाड यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांनी कापूस पिकाच्या उत्पन्न वाढीसाठी विशेष संशोधन केलेले आहे. त्यांच्याच कामाची दखल घेत केंद्र सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर केला आहे. पालघरमधील वारली संगीतकार भिकल्या लाडक्या धिंडा यांनाही पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे.
Web Summary : Raghuveer Khedkar, a folk artist from Maharashtra, receives the Padma Shri. He's known for his Tamasha performances and social awareness efforts. Armida Fernandes, Shrirang Lad, and Bhiklya Dinda also awarded.
Web Summary : महाराष्ट्र के लोक कलाकार रघुवीर खेडकर को पद्म श्री। वे अपने तमाशा प्रदर्शन और सामाजिक जागरूकता प्रयासों के लिए जाने जाते हैं। अर्मिडा फर्नांडीस, श्रीरंग लाड और भिकल्या दिंडा को भी पुरस्कार।