Join us  

व्हायरल होताय 'हे' 5 डायलॉग्स, यातूनचं दिसतं किती दमदार असेल 'टायगर 3'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 4:47 PM

टायगर 3 केवळ अ‍ॅक्शनने भरलेला नाही, तर जबरदस्त डायलॉग्सही ऐकायला मिळणार आहेत.

अभिनेता सलमान खानचा बहुप्रतिक्षित सिनेमा 'टायगर ३' दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. २७ स्पटेंबरला सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे. टायगरचे चाहते या सिनेमासाठी खूपच आतुर आहेत. लोकांना चित्रपटाचा टीझर खूप आवडला आहे.  टीझर समोर येताच चाहते चित्रपटातील डायलॉग्सच्या प्रेमात पडलेत. 

टायगर 3 चा दीड मिनिटांचा व्हिडीओ केवळ अ‍ॅक्शनने भरलेला नाही, तर जबरदस्त डायलॉग्सही ऐकायला मिळतात.  या टीझरमधून ५ डायलॉग्सवर नजर टाकूयात, जे दमदार आहेत.

 

  1. डायलॉग- मेरा नाम अविनाश सिंह राठौर है, पर मैं आप सभी के लिए टाइगर हूं.
  2.  डायलॉग- लोगों को लगता है,  टाइगर गद्दार है. दुश्मन नंबर एक है. 
  3.  डायलॉग- 20 साल की सर्विस के बाद मैं इंडिया से अपना कैरेक्टर सर्टिफिकेट मांग रहा हूं.
  4.  डायलॉग- जिंदा रहा तो आपकी खिदमत में फिर हाजिर, नहीं तो जय हिंद.
  5. डायलॉग- जब तक टाइगर मरा नहीं, तब टाइगर हारा नहीं.

अखेर सलमान खानच्या टायगर 3 चित्रपटाचा टीझर हा 'टायगरचा मॅसेज' या नावाने रिलीज करण्यात आला. दीड मिनिटांच्या व्हिडीओमध्ये सलमान खानची टायगर स्टाईल पाहण्यासारखी आहे.  'टायगर 3' हा YRF spy universe अंतर्गत बनवला जाणारा पाचवा चित्रपट आहे. याशिवाय, हा या फ्रेंचाइजीचा सर्वात महागडा चित्रपट आहे. 300 ते 350 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये हा चित्रपट बनवण्यात येतोय.  

आता टीझरनंतर चाहतेही सलमान खानच्या टायगर 3 ची वाट पाहत आहेत. सलमानचे मागचे काही चित्रपट दणकून आपटले. त्यामुळे आता 'टायगर 3' कडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा आहे. 'एक था टायगर ' आणि 'टायगर जिंदा है'च्या तुफान यशानंतर आता 'टायगर 3' रिलीज होण्यास सज्ज आहे. 'टायगर 3'मध्ये सलमान खानसोबतकतरिना कैफ, इमरान हाश्मी, रेवती, रिद्धी डोग्रा आणि रणवीर शौरी हे कलाकार दिसणार आहेत.

 

टॅग्स :सलीम खानबॉलिवूडवाघटायगर जिंदा हैसिनेमा