Join us

मिलिंद सोमणचा पंतप्रधान मोदींना प्रश्न- लोक इतकं वाईट बोलतात; कसं झेलता?

By अमित इंगोले | Updated: September 24, 2020 14:54 IST

आपण काहीही करतो तेव्हा लोक चांगलं-वाईट म्हणत असतात. यावर पंतप्रधान मोदी यांनी उत्तर दिले की, आपल्याकडे बोललं जातं की, 'निंदक नियरे रखिए...'.

फिट इंडिया मुव्हमेंटच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून देशभरातील लोकांना फिटनेसबाबत जागरूक करणाऱ्या व्यक्तींसोबत संवाद साधला. बॉलिवूड स्टार मिलिंद सोमणही या लिस्टमध्ये सामिल होता. पंतप्रधान मोदी यावेळी त्याच्याशी बोलले आणि मिलिंद सोमणने मोदींना प्रश्नही विचारला. तो म्हणाला की, तुमच्यासाठीही एक प्रश्न आहे. आपण काहीही करतो तेव्हा लोक चांगलं-वाईट म्हणत असतात. यावर पंतप्रधान मोदी यांनी उत्तर दिले की, आपल्याकडे बोललं जातं की, 'निंदक नियरे रखिए...'.

Aajtak ने दिलेल्या वृत्तानुसार, यादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी मिलिंद सोमणसोबत बोलताना गंमतही केली आणि म्हणाले की, 'मेड इन इंडिया मिलिंद'. पंतप्रधान मोदींनी मिलिंद सोमणला विचारले की, सोशल मीडियात तुमच्या वयाची फार चर्चा होत असते. तुमचं खरं वय काय आहे? यावर मिलिंदने उत्तर दिलं की, माझ्या आईचं वय ८१ वर्षे आहे. तरी ती खूप फिट आहे. माझ्यासाठी ती उदाहरण आहे. माझं हे लक्ष आहे की, तिच्या वयात मी सुद्धा तिच्यासारखं फिट रहावं.

मिलिंदने यादरम्यान सांगितले की, तो महिलांसाठी वेगळे इव्हेंट्स ठेवतो आणि लोकांना फिटनेसचा मंत्रा देतो. पीएम मोदींनी सांगितले की, मिलिंदच्या आईचा पुशअप  करतानाचा व्हिडीओ मी पाच वेळा पाहिला. कारण ८१ वयात त्या इतक्या फिट आहेत. 

दरम्यान मिलिंद सोमण म्हणाला की, तुमच्यासाठीही एक प्रश्न आहे. आपण जे काही करतो तेव्हा लोक वाईट बोलतात. हे कसं मॅनेज करता? यावर पंतप्रधान मोदी यांनी उत्तर दिलं की, आपल्याकडे म्हटलं जातं 'निदंक नियरे राखिए'(निदंकाचं घर शेजारी असावं). ते म्हणाले की, ते कोणतंही काम स्वत:साठी करत नाहीयेत. ते हे काम लोकांसाठी, त्यांच्या भल्यासाठी करत आहेत. त्यामुळे तणाव येत नाही. पंतप्रधान मोदी म्हणाले की, तुम्ही तुमचं काम करत रहा आणि दुसऱ्यांचा विचार अजिबात करू नका.

हे पण वाचा :

आलिशान आयुष्य सोडून आर्यन मॅन मिलिंद सोमण करतोय शेती, निसर्गाच्या सानिध्यात घेतोय जगण्याचा खरा आनंद

तरुणांनाही लाजवेल असा उत्साह! मिलिंद सोमणच्या 81 वर्षांच्या आईचा पुशअप्स मारतानाचा व्हिडिओ होतोय व्हायरल

टॅग्स :मिलिंद सोमण नरेंद्र मोदी