आलिशान आयुष्य सोडून आर्यन मॅन मिलिंद सोमण करतोय शेती, निसर्गाच्या सानिध्यात घेतोय जगण्याचा खरा आनंद

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 10:42 AM2020-08-12T10:42:23+5:302020-08-12T10:42:23+5:30

वयाची पन्नाशी ओलांडलेला मिलिंद आजही तरुणींच्या गळ्यातील ताईत आहे.

Milind Soman turns bearded farmer for wife Ankita, shares pics and video of homegrown vegetables | आलिशान आयुष्य सोडून आर्यन मॅन मिलिंद सोमण करतोय शेती, निसर्गाच्या सानिध्यात घेतोय जगण्याचा खरा आनंद

आलिशान आयुष्य सोडून आर्यन मॅन मिलिंद सोमण करतोय शेती, निसर्गाच्या सानिध्यात घेतोय जगण्याचा खरा आनंद

googlenewsNext

कलाकार मंडळी कायम त्यांच्या कामातच बिझी असतात. शुटिंगच्या धबडग्यात त्यांना इतर गोष्टींसाठी किंवा आपल्या कुटुंबीयांना वेळ देणं तितकं शक्य नसतं. मात्र काही जण याला अपवाद असतात. सारं काही सांभाळून हे कलाकार आपल्या कुटुंबाला तितकाच वेळ देतात, शिवाय इतर गोष्टींसाठी आवर्जून वेळ काढतात. आपल्या आवडीनिवडीच्या गोष्टींसाठी ते वेळ राखून ठेवतात. या काळात कलाकार आपले छंद आणि आवड जपतात. अशाच कलाकारांपैकी एक म्हणजे मिलिंद सोमण. वयाची पन्नाशी ओलांडलेला मिलिंद आजही तरुणींच्या गळ्यातील ताईत आहे.

 

'आयर्न मॅन', 'फिटनेस फ्रीक' अशा विविध नावांनी अभिनेता, मॉडेल मिलिंद सोमण ओळखला जातो. मिलिंदचं व्यायामासाठी, फिटनेससाठी असलेलं प्रेम सर्वांनाच ठाऊक आहे.  तो सध्या काय करतो, कुठे आहे, काय चाललंय असे अनेक प्रश्न त्याच्या चाहत्यांना आणि मित्रांना पडले असतील. तर खास त्यांच्यासाठी मिलिंद सोमनचे हे फोटो पाहून कळेलच.  ग्लॅमरच्या दुनियेपासून दूर जात निसर्गाच्या सानिध्यात राहत जीवनाचा खरा आनंद घेताना तो सध्या  पाहायला मिळतो. सतत त्याच्या फिटनेसमुळे चर्चेत असणारा मिलिंद आता वेगळ्या कामामुळे चर्चेत आला आहे. 


मिलिंद आता  नैसर्गिक पद्धतीने शेती करत असल्याचे समोर आले आहे. खुद्द त्याने फोटो शेअर करत चाहत्यांना याबाबत ही माहिती दिली आहे. विशेष म्हणजे त्याची पत्नी अंकिताची इच्छा होती की, मिलिंदने सध्या हे काम करत असल्याचे त्याने म्हटले आहे. चाहते आणि मित्रांकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. मुंबई पासून  दूर जात  तो आपल्या शेतात नैसर्गिक पद्धतीने शेती करतोय. आपल्या शेतात तो नैसर्गिक पद्धतीने विविध पिके घेतो. त्याने आपल्या शेतात मेथी, कोथिंबीर, कोबी, मुळा अशा विविध भाज्या आणि पिके घेतली आहेत. 

Web Title: Milind Soman turns bearded farmer for wife Ankita, shares pics and video of homegrown vegetables

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.