सौंदर्यवती मानुषी छिल्लर लवकरच अक्षय कुमारसोबत पृथ्वीराज या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज आहे आणि सध्या ती पहिल्यांदाच घरी गणेशोत्सव साजरा करणार असल्याने बरीच उत्साही आहे! ही 23 वर्षांची सौंदर्यवती मिस वर्ल्ड मूळ हरियाणाची असली तरी सध्या तिचे वास्तव्य मुंबईत आहे आणि हे शहरही तिच्यासाठी घरासारखेच आहे. तिला यंदा कुटुंबासोबत घरी गणेश पूजा करायची आहे.पहिल्यांदाच घरी गणेश स्थापना करणारी मानुषी म्हणाली, "माझ्या आईवडिलांना नेहमी वाटायचं की मी विविध संस्कृतींचा अनुभव घ्यायला हवा, ते सगळं साजरा करायला हवं. मी मूळची हरियाणाची असले तरी आता मुंबईसुद्धा माझं घरच आहे. या शहरातला गणेशोत्सव मी पहिल्यांदा अनुभवला तेव्हा भारावून गेले होते. तो उत्साह, ते प्रेम, ती निष्ठा... महाराष्ट्रातील लोक ज्यापद्धतीने गणपती साजरा करतात ते सगळं फारच खास आहे आणि मी फारच मोहून गेले."
पहिल्यांदाच मानुषी छिल्लरच्या घरी विराजमान होणार गणपती बाप्पा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2020 09:00 IST
मानुषी छिल्लर पहिल्यांदाच घरी गणेशोत्सव साजरा करणार असल्याने बरीच उत्साही आहे!
पहिल्यांदाच मानुषी छिल्लरच्या घरी विराजमान होणार गणपती बाप्पा
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}