Join us

फवाद खानचं बॉलिवूडमध्ये कमबॅक, वाणी कपूरसोबत करणार रोमान्स; प्रोमो रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 13:01 IST

फवाद खानला पुन्हा हिंदी सिनेमात बघण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

पाकिस्तानी अभिनेता फवाद खान (Fawad Khan) बॉलिवूडमध्ये कमबॅक करत आहे. त्याच्या सिनेमाची चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. अभिनेत्री वाणी कपूरसोबत त्याचा 'अबीर गुलाल' सिनेमा येणार आहे. सिनेमाचा पहिला प्रोमो नुकताच रिलीज करण्यात आला आहे. फवादचा चार्मिंग लूक आणि वाणीसोबत त्याची केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. सिनेमा मे महिन्यात रिलीज होणार आहे.

भारतात पाकिस्तानी कलाकारांना बंदी केल्यापासून फवाद खानही हिंदी सिनेसृष्टीतून गायब झाला. त्याने 'ए दिल है मुश्किल', 'खूबसूरत', 'कपूर अँड सन्स' सिनेमांमध्ये काम केलं होतं. वाणी कपूरने 'अबीर गुलाल'चा पहिला प्रोमो शेअर केला आहे. 'तुम्ही शेवटचं कधी प्रेमात पडला?' असं सुरुवातीला लिहून येतं. नंतर कुमार सानूचं 'कुछ ना कहो' गाणं बॅकग्राऊंडला ऐकू येतं. फवाद हे गाणं गुणगुणताना दिसतो. शेवटी वाणी फवादला विचारते, 'तू माझ्यासोबत फ्लर्ट करतोय का?' फवाद म्हणतो,'मी करायला हवंय का?' वाणीने या पोस्टसोबत लिहिले, "प्रतीक्षा संपली. अबीर गुलाल मधून मी आणि फवाद मोठ्या पडद्यावर लव्हस्टोरी घेऊन येत आहोत. ९ मे रोजी सिनेमा प्रदर्शित होत आहे."

'अबीर गुलाल' सिनेमाची निर्मिती विवेक अग्रवाल, अवंतिका हरी, राकेश सिप्पी यांनी केलं आहे. अमित त्रिवेदी सिनेमासाठी संगीत दिलं आहेत. आरती बागडी यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. गेल्या वर्षीच सप्टेंबर महिन्यात सिनेमाचं शूट लंडनमध्ये सुरु झालं होतं. ९ मे रोजी सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होत आहे. 

टॅग्स :फवाद खानबॉलिवूडवाणी कपूरसिनेमा