Join us
Daily Top 2Weekly Top 5

फातिमा सना शेखला अभिनयाव्यतिरिक्त आवड 'या' गोष्टीची, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2018 10:52 IST

‘दंगल’मध्ये फातिमा सना शेखने गीता फोगटची भूमिका साकारली होती. हा सिनेमा सुपरडुपर हिट झाला होता. या सिनेमात फातिमा आमिरच्या मुलीच्या भूमिकेत होती. या सिनेमातील फातिमाच्या भूमिकेची देखील चांगलीच चर्चा झाली होती.

प्रत्येकाला काही ना काही छंद किंवा आवड असते. सर्वसामान्य असो किंवा मग सेलिब्रिटी, सगळेच आपला छंद आणि आवड जोपासताना पाहायला मिळतात. अभिनयाच्या कौशल्यासह आपल्या अंगभूत कलांनी विविध कलाकार आपलं वेगळेपण जपतात. काही कलाकार फिटनेस फ्रिक असतात तर काहींना गायनाचे वेड असतं तर काहीजण उत्तम कुक असतात. अशाच कलाकारांपैकी आपलं वेगळेपण जपणारी अभिनेत्री म्हणजे फातिमा सना शेख़. तिलाही अभिनयाव्यतिरिक्त डान्सचीही आवड आहे. तिचे डान्सिंग व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

तिचे डान्सिंग कौशल्या पाहून तिच्या अनेक चाहत्यांनी तिच्या व्हीडीओला अनेक लाईक्स आणि कमेंटस दिल्याचे पाहायला मिळत आहे. तिचा डान्सिंग व्हिडीओ खूप व्हायरलही होत असल्याचे पाहायला मिळत आहे. ऑनस्क्रीन रसिकांची पसंती मिळवल्यानंतर आता तिचा ऑफस्क्रीन अंदाजही पसंतीस पात्र ठरत आहे.

सध्या फातिमा वेगळ्याच कारणामुळेही चर्चेत आहे. यादरम्यान ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ मध्ये फातिमाला कास्ट केल्यामुळे आमिरची पत्नी किरण राव नाराज असल्याची बातमीही आली होती. त्याआधी तर फातिमा आणि आमिरबद्दल वेगळीच चर्चा रंगली होती. आमिर आणि फातिमाच्या वाढत्या जवळीकीच्या बातम्या दबक्या आवाजात सुरू होत्या. दोघेही परस्परांच्या बरेच जवळ आले आहेत आणि हे नाते मैत्रीपेक्षा बरेच पुढे गेलेय, अशी ही चर्चा होती. या बातम्यांनी किरण राव अस्वस्थ असल्याचेही कानावर आले होते. 

फातिमा सना शेख नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत या विषयावर भरभरून बोलली आहे. तिच्यामते सध्या या सगळ्या अफवा ऐकण्याची तिला सवयच झाली आहे. बॉलिवूड हंगामा या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत ती सांगते, माझ्याबद्दल जी काही चर्चा सुरू आहे, हे खूपच विचित्र आहे. एकदा माझी आई टीव्ही पाहात होती आणि टिव्ही पाहाताना तिने मला हाक मारली आणि म्हणाली तुझा फोटो टिव्हीवर दाखवत आहेत. त्या खाली काय हेडलाईन आहे हे मी वाचायला गेले तर मला धक्काच बसला. सुरुवातीला या गोष्टीचा मला खूप त्रास झाला होता. लोकांना या गोष्टीबद्दल स्पष्टीकरण द्यावे असे मला त्यावेळी वाटत होते. पण लोक माझ्याबाबत काय विचार करतात, माझ्याबाबत काय बोलतात याबाबत मी कोणालाही काहीही सांगायची गरज नाहीये असे मला वाटते.  

‘दंगल’मध्ये फातिमा सना शेखने गीता फोगटची भूमिका साकारली होती. हा सिनेमा सुपरडुपर हिट झाला होता. या सिनेमात फातिमा आमिरच्या मुलीच्या भूमिकेत होती. या सिनेमातील फातिमाच्या भूमिकेची देखील चांगलीच चर्चा झाली होती.

 

टॅग्स :फातिमा सना शेखआमिर खान